तोतया पोलिसाचा नवा कारनामा उघड ; सराफालाही 20 लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

बेंद्रे यांची ए. के. जोशी शाळेसमोर पेढी आहे. त्यांच्या पेढीवर 21 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास पालवे हा ग्राहक बनून आला. त्याने एकूण 19 लाख 40 हजार रुपये किमतीचे दागिने खरेदी केले.

ठाणे : पोलिस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करून फसवणूक करणारा तोतया एटीएस अधिकारी गजानन पालवेचे आणखी कारनामे उघड होऊ लागले आहेत. त्याने नौपाड्यातील विजय बेंद्रे या सराफाला 20 लाखांचा गंडा घातला आहे. त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर नौपाड्यातील सराफांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

बेंद्रे यांची ए. के. जोशी शाळेसमोर पेढी आहे. त्यांच्या पेढीवर 21 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास पालवे हा ग्राहक बनून आला. त्याने एकूण 19 लाख 40 हजार रुपये किमतीचे दागिने खरेदी केले. त्या दागिन्यांचे पैसे भरण्यासाठी त्याने दोन धनादेश दिले होते. ते न वटल्यामुळे बेंद्रे यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पालवेच्या चौकशीत आणखीही कारनामे समोर येण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Fraud 20 Lakh Jwellers Bogus Police