बनावट ई-मेलद्वारे फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

मुंबई : भारतीय कंपनीच्या नावाने बनावट ई-मेल आयडी आणि बॅंक खाते तयार करून टांझानियातील कंपनीची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अर्चना ॲम्पाऊल्स प्रा. लि. कंपनीचे मुंबईतील ताडदेव येथे कार्यालय आहे. आरोपींनी या कंपनीच्या ईमेल आयडीशी साधर्म्य राखणारा ई-मेल आयडी तयार करून त्याद्वारे टांझानियातील ग्राहक कंपनीला ई-मेल पाठवला. त्यात बनावट खाते क्रमांक नमूद करून त्यावर पैसे जमा करण्यास सांगितले. त्यामुळे या कंपनीला नुकसान झाले.

Web Title: Fraud by fake e-mail