आज करा माेफत रिक्षाचा प्रवास....पहा कुठे ते!

सकाळ वृत्‍तसेवा
Wednesday, 19 February 2020

उरण : शिवजयंतीनिमित्त उरणमधील चिरनेर येथील श्री महागणपती तीनआसनी रिक्षाचालक-मालक संस्थेने प्रवाशांसाठी एक दिवस मोफत प्रवास ठेवला आहे. 

ही सेवा चिरनेर ते कोप्रोली, दिघोडे, खारपाडा व चिरनेर ते केळवणे या मार्गावरील प्रवाशांसाठी सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. रिक्षाचालकांनी प्रवाशांना दिलेल्‍या अनोख्या भेटीमुळे सर्वस्‍तरातून त्‍यांचे कौतुक होत आहे. श्री महागणपती तीनआसनी रिक्षाचालक-मालक संस्थेचा १९ फेब्रुवारी हा प्रथम वर्धापन दिवस आहे. गेल्या वर्षी शिवजयंतीच्या मुहूर्तावर तीनआसनी रिक्षाचालक-मालक संस्थेची स्थापना केली होती. 

हे पण वाचा ः कवितांनी फुलले हास्‍यांचे कारंजे 

ग्राहकांना झटपट, स्वस्त व शिस्तबद्ध सेवा पुरविणाऱ्या संस्थेने एक दिवस शिवविचारांनी प्रेरित होऊन मोफत सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे समाजातून कौतुक केले जात आहे. रिक्षाचालकांच्या वर्तणुकीबद्दल नेहमीच ताशेरे ओढले जातात; मात्र आजही काही चालक प्रामाणिकपणे संसाराचा गाडा हाकत आहेत. 

हे पण वाचा ः धक्‍कादायक! कोरोनानंतर टोमॅटो व्हायरसचा जगाला धोका

समाजाप्रती आपण काही देने लागतो, हाच हेतू डोळ्यासमोर ठेऊन उरणमधील श्री महागणपती तीनआसनी रिक्षाचालक-मालक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत प्रवाशांना शिवजयंतीला मोफत प्रवास करण्याची अनोखी भेट दिली आहे. त्‍यामुळे भाविकांनी संघटनेचे कौतुक केले आहे. 

शिवजयंतीनिमित्त सकाळी साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच पूजन, दुपारी साडेतीन वाजता पूजा व सायंकाळी ६ वाजता महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे संस्थापक रावण फोफेरकर यांनी केले आहे. या उपक्रमाचा आदर्श अन्य संघटनांनीही घ्‍यावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: free rickshaw ride today…