मैत्रीचा अर्थ शारीरिक संबंधाला परवानगी असा नाही - मुंबई उच्च न्यायालय

न्यायालयाने हे नमूद करत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
Rape
RapeSakal

मुलीसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत म्हणून कोणताही पुरुष ती शारीरिक संबंधांसाठी तयार आहे, असं गृहित धरू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. मुंबईतल्या एका पुरुषाची जामिनाची याचिका फेटाळताना हा निर्णय देण्यात आला. या पुरुषावर बलात्कार आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (Mumbai High Court news)

Rape
समाजमाध्यमावरील पोस्ट खऱ्या असतातच असे नाही - मुंबई उच्च न्यायालय

काय आहे हे प्रकरण?

फिर्यादी २२ वर्षीय तरुणी २०१९ साली तिच्या मित्रासोबत आणखी एका मित्र/मैत्रिणीच्या घरी गेली होती. तिथं आरोपीने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिने या गोष्टीला आक्षेप घेतला तेव्हा त्याने सांगितलं की त्याचं तिच्यावर प्रेम आहे आणि तो तिच्याशी लग्नही करायला तयार आहे. त्यानंतर एप्रिल २०१९ ते २०२२ पर्यंत अनेकदा त्यांचे संबंध आले. फिर्यादी तरुणीने सांगितलं की आरोपीने लग्नाचं वचन दिल्यानंतर अनेकदा शारीरिक संबंध (Forceful Sexual intercourse) आले. त्यानंतर फिर्यादी तरुणी गरोदर राहिली आणि गर्भधारणेला सहा आठवडे झाल्याचं लक्षात आलं. तेव्हा तिने तात्काळ ही गोष्ट आरोपीला सांगितली. मात्र आरोपीने जबाबदारी घेण्यास नकार दिला. उलट त्याने तिलाच दोष दिला आणि तिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध आल्याचा आरोप केला. तरुणीने आरोपीला अनेकदा लग्न करण्याची विनंती केली. मात्र त्याने नकार दिला.

Rape
लिव्ह-इन रिलेशनशिपमुळे लैंगिक गुन्ह्यांमध्ये वाढ - मध्य प्रदेश उच्च न्यायालय

न्यायालयाने काय म्हटलंय?

न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्तींनी सांगितलं की फिर्यादी तरुणीच्या मनात आरोपीबद्दल प्रेमभावना होत्या. पण तिच्या जबाबानुसार, आरोपीने लग्नाचं वचन दिल्यापासूनच तिने शारीरिक संबंध करण्यास परवानगी दिली. लग्नाच्या वचनावरच अनेकदा शारीरिक संबंध झाले होते. मात्र, जेव्हा मुलगी गरोदर राहिली, तेव्हा त्याने तिला दोष दिला. त्यानंतरही आरोपीने तरुणीसोबत संबंध ठेवले.

Rape
'लैंगिक संबंध नाकारणे' हे घटस्फोटासाठी कारण होऊ शकत नाही: दिल्ली उच्च न्यायालय

आजच्या या जगात जेव्हा स्त्री-पुरुष एकत्र काम करत असतात, तेव्हा असं होऊ शकतं की दोघांमध्ये काहीतरी भावना निर्माण होतील, किंवा दोघेही एकमेकांना मित्र म्हणून पूरक वाटू शकतील. त्या मैत्रीला लिंगाचं बंधन नसतं. पण ही मैत्री झाली तर पुरुषाला कोणताही हक्क मिळत नाही की त्याने स्त्री नाही म्हणत असतानाही जबरदस्तीने तिच्याशी संबंध प्रस्थापित करावेत. प्रत्येक महिलेला नात्यामध्ये आदराची अपेक्षा असते. इथं हा आरोपी लग्नाचं वचन देत तरुणीशी संबंध ठेवत होता. पण जेव्हा तरुणी गरोदर राहिली तेव्हा त्याने पाठ फिरवल, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

तरुणीला शारीरिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती कऱण्यात आली, असं नमूद करत न्यायालयाने (High Court) या आरोपीची जामिनाची याचिका रद्द केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com