मुंबईत मित्रांनीच केला मित्राचा वाढदिवशी खून

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जुलै 2019

या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने नितेशला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नितेशचा त्याच्या मित्रांसोबत वाद झाला होता. त्याच वादातून ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मुंबई : मुंबईतील घाटकोपर भागात पूर्व वैमनस्यातून मित्रांनीच मित्राचा वाढदिवशी खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरमध्ये मित्रांनीच कट रचून मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याचा खून केला. नितेश सावंत असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. नितेश त्याच्या मित्रासोबत एका पार्कमध्ये वाढदिवस साजरा करत होता. त्याचवेळी त्याच्या मित्रांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यास सुरुवात केली. नितेशवर हल्ला केल्यानंतर हे सगळेजण फरार झाले आहेत.

या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने नितेशला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नितेशचा त्याच्या मित्रांसोबत वाद झाला होता. त्याच वादातून ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: friends killed youth in mumbai