फळविक्रेत्याचा गोळ्या घालून खून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

मिरा रोड - काशी-मिरा हद्दीतील मिरा गाव येथे एका फळविक्रेत्याचा घरात घुसून अज्ञात व्यक्तीने बंदुकीची गोळी झाडून खून केला. या हत्येचे कोणतेही कारण स्पष्ट झाले नाही. गोळीबाराचा पूर्ण थरार सीसी टीव्हीत कैद झाला आहे. याबाबत काशी-मिरा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

श्‍यामू गौड असे हत्या झालेल्या विक्रेत्याचे नाव आहे. काशी-मिरा येथील मिरा गावात हा फळविक्रेता आपल्या कुटुंबीयांसह राहत होता; तर काशी-मिरा येथील अमर पॅलेस येथे फळविक्रीचा त्याचा व्यवसाय होता. बुधवारी (ता. 5) मध्यरात्री 2 च्या सुमारास दोन मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी प्रथम घराचा दरवाजा वाजविला. दार उघडताच त्यांनी घरात घुसून गौडवर गोळीबार केला. यामध्ये गौड जागीच ठार झाला. दोन्ही आरोपी मोटरसायकलवर बसून पळून गेले. ही घटना सीसी टीव्हीत कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच मिरा-भाईंदर विभागाचे डीवायएसपी नरसिंग भोसले, ठाण्याचे पोलिस अधीक्षक महेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसी टीव्हीचे चित्रण ताब्यात घेतले. याबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात काशी-मिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपीच्या शोधासाठी विशेष पथकही रवाना केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: Fruit seller Pills murder