चांदा ते बांदा योजनेसाठी 10 कोटींचा निधी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 मार्च 2017

मुंबई - चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात "रिसोर्स बेस्ड प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट' हा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यासाठी चांदा ते बांदा ही योजना वन विभागांतर्गत राबविण्यास 10 कोटी 17 लाख रुपयांचा निधी वितरित आणि खर्च करण्यास वन विभागाने मान्यता दिली आहे.

नियोजन विभागाने 28 जून 2016 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिल्यानंतर या योजनेतील वन विभागाशी संबंधित कामे करण्यासाठी हा निधी मंजूर केला. राज्यमंत्री वित्त व नियोजन यांच्या अध्यक्षतेखाली या पथदर्शी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर वनवृत्तामध्ये मोहाफुले गोळा करणे, त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे, मधमाशापासून बनवलेले (मध पोळ्यापासून) मध उत्तम दर्जाचे असल्याने मधमाशी संकलन पेटीची काळजी घेणे आणि सफाई करण्यासाठी वेळोवेळी मधमाशी संकलनकर्त्याला प्रशिक्षण देणे, त्या अनुषंगाने चंद्रपूर वनवृत्तामधील संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत सदर क्षेत्रात प्रशिक्षण केंद्र उभारणे व तेथील जनतेला प्रशिक्षण व मार्गदर्शन देणे यासारखे काम केले जाणार आहे.

Web Title: fund for chand to banda scheme