esakal | नेतृत्वात मूलभूत बदल;टाटा सन्समध्ये नाहीत : एन. चंद्रशेखरन
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नेतृत्वात मूलभूत बदल;टाटा सन्समध्ये नाहीत : एन. चंद्रशेखरन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : टाटा सन्स (Tata Sons) च्या नेतृत्वप्रणालीत कोणतेही मूलभूत बदल करण्याचा प्रस्ताव नाही, असा खुलासा टाटा सन्स चे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांनी केला आहे.

आज काही प्रसारमाध्यमांमध्ये यासंदर्भात वृत्ते प्रसिद्ध झाली असली तरी तसा कोणताही प्रस्ताव नाही. असे काही सुयोग्य प्रस्ताव असतीलच तर त्यावर संबंधित समितीत ( नॉमिनेशन अँड रेम्युनरेशन कमिटी ) निर्णय घेतला जातो. नियमित कामकाजात अडथळे आणणाऱ्या अशा बातम्यांमुळे आम्ही खूपच निराश झालो आहोत, असेही चंद्रसेकरन यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा: मुंबई महापालिका रोखणार 'सुप्त क्षयरोगा'चा प्रसार; राबविणार विशेष मोहिम

टाटा सन्समध्ये सीईओ नियुक्त करण्याचा प्रस्ताव असल्याची वृत्ते आज सर्वत्र प्रसिद्ध झाली आहेत. टाटा सन्स ही टाटा ग्रूपच्या सर्व कंपन्यांची मुख्य कंपनी आहे.

loading image
go to top