फंगल इन्फेक्‍शनवरील क्रिम वापरताना काळजी घ्या!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

मुंबई - बुरशीजन्य संसर्ग (फंगल इन्फेक्‍शन) रोखण्यासाठी एखादी क्रिम किंवा औषध वापरत असाल, तर काळजी घेण्याचे आवाहन डॉक्‍टर करत आहेत. क्रिममधील उत्तेजकांच्या (स्टेरॉइड) वापरामुळे त्वचा पातळ होणे, त्या त्वचेवर केस येणे आणि व्रण आदी समस्या उद्‌भवू शकतात, अशी भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली.

उन्हाळ्यात घामामुळे होणाऱ्या फंगल इन्फेक्‍शनचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी माहितीतील किंवा जाहिरातीत दाखवल्या जाणाऱ्या क्रिमचा वापर करण्यावर भर दिला जातो. मात्र, तसे केल्यास त्वचेसंबंधी आजार होऊ शकतात, असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. जेजे रुग्णालयाच्या त्वचाविकार विभागाचे डॉ. रत्नाकर कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार, लगेच गुण दिसावेत यासाठी अनेकदा क्रिममध्ये स्टेरॉइडचा वापर केला जातो. मात्र, अनेकदा स्टेरॉइड अनावश्‍यक असते. काही जण माहीत असलेल्या किंवा कुणीतरी दिलेल्या क्रिमचा वापर करतात. अशा वेळी ते क्रिम गरजेपेक्षा अधिक वेळा वापरल्यास त्वचेचे विकार उद्‌भवू शकतात. त्वचेवर पांढरे चट्टे, कधी बरे न होणारे व्रण किंवा औषध वापरलेल्या जागी अनावश्‍यक केस वाढणे यांसारख्या तक्रारी दिसू लागतात, असे डॉ. कामत यांनी सांगितले. त्यामुळे डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचा वापर करावा, असा सल्लाही ते देतात.

स्टेरॉइड कसे ओळखाल?
क्रिममध्ये असलेल्या घटकांच्या यादीत शेवटी इंग्रजीत "एसओएनई' अशी अद्याअक्षरे असतील, तर ते स्टेरॉइड आहे हे लक्षात घ्यावे, अशी माहितीही डॉ. रत्नाकर कामत यांनी दिली.

Web Title: fungal infection cream care