esakal | फौजदारी फिर्याद दाखल झालेल्या गजानन काळेंना अटकपूर्व जामीन मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

court

फौजदारी फिर्याद दाखल झालेल्या गजानन काळेंना अटकपूर्व जामीन मंजूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कौटुंबिक हिंसाचाराची फौजदारी फिर्याद दाखल झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज अटकपूर्व जामीन मंजूर केला.

काळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. मानसिक, शारीरिक छळ, जातीवाचक शिवीगाळ, मारहाण इ. आरोप पत्नीने केले आहेत. यामध्ये अटक होण्याच्या भितीमुळे काळे यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्या संदीप शिंदे यांच्या पुढे यावर सुनावणी झाली. न्यायालयाने आज काळे यांना जामीन मंजूर केला.

माझ्या विरोधात दाखल केलेले आरोप आधारहिन आहेत आणि केवळ घरगुती वादातून तक्रार केली आहे, असा दावा काळे यांनी केला आहे. तर उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, असे काळे यांच्या पत्नीच्या वतीने सांगण्यात आले आहे. यापूर्वी ठाणे सत्र न्यायालयाने काळे यांचा जामीन अर्ज नामंजूर केला होता.

loading image
go to top