‘गांधी’ दीडशे वेळा पाहिला - राज

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 जून 2018

मुंबई - आतापर्यंत अनेक चरित्रपट (बायोपिक) आले. त्यामध्ये रिचर्ड ॲटनबरो यांच्या ‘गांधी’ या चित्रपटामुळे सर्वाधिक भारावलो. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत असताना महाविद्यालयाला दांडी मारून हा चित्रपट सुमारे १५० वेळा पाहिला, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावरील ‘भाई ः व्यक्ती की वल्ली’ या महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाच्या मुहूर्तप्रसंगी ते बोलत होते. हा चित्रपटही ‘गांधी’च्या तोडीचा होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

भाईंना दोन वेळा भेटलेलो आहे. त्यांच्याबरोबर झालेली भेट अविस्मरणीय होती. त्यांच्याबद्दल बोलण्याइतका मोठा नाही. पुलंनी अनेक व्यक्तिरेखा अजरामर केल्या आहेत.  त्यातील अंतू बर्वा, नारायण यांच्यासारख्या व्यक्तिरेखा, त्यांच्यावरील प्रसंग आणि त्या व्यक्तिरेखा कशा दिसल्या याचे रेखाटन सहा ते आठ महिने करत आहे. पुढील आठ महिन्यांत ते पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

पुलंच्या व्यक्तिमत्त्वाचे व्यक्तिगत आयुष्य नेमके कसे होते. हे लोकांसमोर फारसे आले नाही. या चित्रपटातून पुलंच्या आयुष्याचे अप्रकाशित पैलु प्रेक्षकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, असे महेश मांजरेकर यांनी सांगितले. या चित्रपटाचे संवाद रत्नाकर मतकरी हे लिहीत आहेत; तर गणेश मतकरी पटकथाकार आहेत. तसेच, पुलंची भूमिका सागर देशमुख, तर सुनीताबाईंची चित्रपटातील भूमिका इरावती हर्षे साकारणार आहेत.

Web Title: gandhi movie watching raj thackeray