गणेशोत्सवात कल्याण पूर्वमध्ये बत्ती गुल; गणेशभक्त नाराज, नागरिक त्रस्त

रविंद्र खरात 
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

गणेशोत्सव शुक्रवार 25 ऑगस्ट पासून सुरु होताच कल्याण पूर्व मधील कोळशेवाडी, तिसगाव, गणेश वाडी, दुर्गामाता मंदिर रोड, संतोषनगर, आदीसह अन्य भागात दिवसभर वीज पुरवठा अनेक वेळा खंडीत होत असल्याने कल्याण पूर्व मधील नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.

कल्याण : शुक्रवारपासून गणेशोत्सव सुरु झाला असून, गणेशोत्सव निम्मित विविध कार्यक्रम, पूजा -अर्चा, स्पर्धा, विसर्जन सोहळा मिरवणूक, हे पाहण्यासाठी गर्दी असते मात्र कल्याण पूर्व मध्ये ऐन गणेशोत्सवामध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने गणेशभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे . 

पावसाळ्यापूर्वी सर्व सरकारी यंत्रणा पावसाळ्यात त्रास होवू नये म्हणून दुरुस्तीची काम करत असते, पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होणार नाही अपेक्षित होते मात्र या अपेक्षा फोल ठरल्या आहेत, गणेशोत्सव शुक्रवार 25 ऑगस्ट पासून सुरु होताच कल्याण पूर्व मधील कोळशेवाडी, तिसगाव, गणेश वाडी, दुर्गामाता मंदिर रोड, संतोषनगर, आदीसह अन्य भागात दिवसभर वीज पुरवठा अनेक वेळा खंडीत होत असल्याने कल्याण पूर्व मधील नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. गणेशोत्सव मध्ये अनेकांच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केल्याने दर्शनासाठी पाहुणे, नागरीक येत असल्याने वीजपुरवठा सुरु ठेवणे अपेक्षित आहे मात्र नागरिकांचा अपेक्षा भंग झाला आहे . 

गणेशोत्सव सुरु होताच कल्याण पूर्व मध्ये लाइट गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे, अश्या काळात महिलानी देव दर्शनासाठी कसे बाहेर पडायचे, याबाबत काही अधिकारी अथवा कर्मचारी वर्गाकडे विचारपूस केल्यास गणेश मंडळाना विद्युत पुरवठा करण्यासाठी काही काळ विद्युत पुरवठा खंडित करावा लागतो, मात्र एका भागात ठीक मात्र अन्य भागातही लाइट जाते त्याचे क़ाय असा सवाल कल्याण पूर्व मधील महिला कार्यकर्ती ज्योती पवळे यांनी केला आहे . 

मुसळधार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घेतल्याने विद्युत पुरवठा खंडित करावा लागतो, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कल्याण परिमंडळ उपमुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी केले आहे .

Web Title: ganesh festival 2017 kalyan dombivali electricity