....आणि बाल गणेशाचे आगमन मुंबईत होतेय लोकल ट्रेनने

दिनेश चिलप मराठे
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

गणरायाचे 'झुकझुक' आगीनगाडीतून आगमन

मुंबादेवी : भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला काल (गुरुवारी) रात्रीच गणरायाच्या आगमनासाठी सर्वच मुंबईकर सज्ज झाले. सर्वच भक्त बाप्पांना घरी आणण्यासाठी आपापल्या इच्छेने कोणी ट्रक - टेम्पो, तर कोणी रथातून आगमनाची तयारी करतात. अनेकांनी लोकल ट्रेनने बाप्पांना घरी आणले. 

चतुर्थीला श्री गणेशाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा. गणपती बाप्पांना आपल्या घरी लवकरात लवकर न्यायच्या एका अनामिक आणि आनंददायी ओढीने उमरखाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या यांचा बाल गणेशा प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरू तेगबहादूर (GTB) नगर येथील गणेश चित्र शाळेतून लोकल ट्रेनचा प्रवास करीत कृष्णकाली यांच्या घरी आगमनस्थ होत विराजमान झाला. गणेशभक्त आपला जास्वंद फुलावर आसनस्थ बाल गणेशा लोकल ट्रेनने घरी नेताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
पोलिसानेच हिसकावले भिकाऱ्याचे पैसे
गणेशाची व्रते 
उत्तर प्रदेशात गर्भवती महिलेला तोंडी तलाक
शिक्षण सोडून 'तो' बनला दहशतवादी
खासगीपणाच्या हक्काला आधार (अग्रलेख)
महिलांकडून परिवर्तनाचा ‘श्रीगणेशा’
बाप्पा... लौकर या! (ढिंग टांग!)
शांतता सुळावर? 
ध्वनिक्षेपक वापरात गणपतीत चार दिवस सूट 

Web Title: ganesh festival 2017 mumbai ganesh festival