76 वर्षाची परंपरा जपलेला खोपटे गावातील गौरा उत्सव

राजकुमार भगत
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

येथे अंत्यंत देखणे असे शिवमंदिर उभारण्यात आले आहे. तेव्हापासून या मंदिरातच शिवगौऱ्याची प्रतिष्ठापना केली जाते.

उरण : उरण तालुक्यातील खोपटे, पाटीलपाडा येथिल शिवकृपा गौरा मंडळाने एक अनोखी प्रथा जपली आहे. गेल्या 76 वर्षापासून येथे दरवर्षी नियमितपणे गौरा उत्सव साजरा केला जात असून गौरीच्या दिवशी येथे शंकराची प्रतिष्ठापना केली जाते. तालुक्यातील सगळ्यात जूने हे गौरामंडळ असून या शिवगौऱ्यांच्या दर्शनासाठी उरण, पनवेल, पेण आणि अलिबाग तालुक्यातील लोक येतात. सगळीकडे गणेश चतूर्थीची धामधुम सुरू असताना खोपटा ग्रामस्थ हे शंकरांची प्रतिष्ठापना करतात. भाद्रपद शुद्ध अष्टमीला शंकराची प्रतिष्ठापना करून भाद्रपद शुद्ध द्वादशीला या गौऱ्याचे विसर्जन केले जाते. संपूर्ण खोपटे ग्रामस्थांबरोबरच तालुक्यातील सगळ्या गावातील लोक या उत्सवात मोठ्या श्रद्धेने भाग घेतात.

1941 साली खोपटे पाटीलपाडा येथिल रामजी तुकाराम पाटील, रघुनाथ पोशा पाटील, विश्वनाथ नामा पाटील, जनार्दन गोविंद पाटील, रामभाउ बाळाराम भगत,दादु सावळाराम पाटील, जगन्नाथ हसूराम पाटील अशा वीसजणांनी खोपटे पाटीलपाडा ग्रामस्थांच्या सहकार्याने या मंडळाची स्थापना केली. पूर्वी एका जुन्या घरात या शिवगौऱ्याची स्थापना करत असत कालांतराने त्या घरमालकाने हे घर या शिवकृपा गौरा मंडळासाठी दिले त्यानंतर दहा वर्षापूर्वी येथे परेशशेठ देडीया यांच्या अर्थिक मदतीतून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने येथे अंत्यंत देखणे असे शिवमंदिर उभारण्यात आले आहे. तेव्हापासून या मंदिरातच शिवगौऱ्याची प्रतिष्ठापना केली जाते.

दरवर्षी गणेशाच्या स्थापनेनंतर येथील शिवमंदिरात गौ-यांची स्थापनेबरोबरच ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक कथाप्रसंगाद्वारे संदेश देणारी शाडूच्या मातीतील सुबक चित्रे आणि आकर्षक देखावे असतात. या वर्षी महाभारतातील युद्धाचा देखावा उभारला आहे.  दररोज रात्री उशिरापर्यंत विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पहिल्या दिवशी महिलांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जात नाही.  या मंडळातर्फे सतत पाच दिवस सांस्कृतीक कार्यक्रम, भजन किर्तन, गोंधळ, महिलांचे तसेच पुरूषांचे पारंपारिक नाच यासाऱखे कार्यक्रम सतत असतात. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 75 वर्षापासून येथे पायाला घुंगरू बांधुन नाच झाल्या शिवाय या उत्सवाची सांगता होत नाही.

नवसाला पावणारा  अशी या गौऱ्याची ख्याती आहे. शिवकृपा गौरा मंडळ हे हा गौऱ्यांचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असताना पर्यावरणाला हानी पोहचणार नाही याची दक्षता देखील घेतली जाते. 76 वर्षापासून हा सण साजरा करत असताना या ईथे बनविण्यात येणारे देखावे आणि शंकराची मुर्ती फक्त शाडूच्या मातीपासूनच बनविलेली असते. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी गौरा अंगात संचारून दृष्टांत देत असल्याची येथिल गावकऱ्यांची श्रद्धा आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
राज्य मार्गावरील दारूविक्रीचा मार्ग खुला
भाजपच्या विरोधात शिवसेनेचा 'निष्ठावंत' फॉर्म्युला
नोटाबंदीचा लाभ झाल्याचा दावा; संशयास्पद व्यवहार उघड
सुनील अरोरा नवे निवडणूक आयुक्त; राजीव महर्षी 'कॅग'
सुज्ञ कोल्हापूरकर...!
उजनीचे पाणी पंढरपुरात
इमारतींच्या पुनर्विकासाचा आराखडा सरकारकडे नाही!
दक्षिण मुंबईतील इमारत कोसळून 21 ठार; 12 जखमी
मुंबईतील पावसाच्या बळींची संख्या नऊवर

Web Title: ganesh festival 2017 mumbai ganesh festival uran gauri