सणासुदीला सफाळयात पार्किंगमुळे नागरिक हैराण 

प्रमोद पाटील
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

सफाळे : ऐन सणासुदीच्या काळात येथील गाड्या पार्किंगची समस्या आ वासून उभी राहिली असून लोकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याने संतापाची लाट उसळली आहे.

पश्चिम रेल्वेचे सफाळे हे एक महत्वाचे  रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकापासून मुंबई आणि मुंबई उपनगरात तसेच गुजरात राज्यात जाण्यासाठी दररोज हजारो प्रवासी असतात. तसेच या रेल्वे स्थानकाच्या आजुबाजुला असलेल्या पन्नास गावांची सफाळे ही मुख्य बाजारपेठ असल्याने येथे दिवसंभर गर्दी होत आहे.

रेल्वे स्थानकापासून तांदूळवाडी- पारगाव रोड च्या दोन्ही बाजूला लहान लहान भाजीपाला विक्रॆते तसेच किरकोळ फळे विक्रेते बसतात. या मुळे रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी खुपच गर्दी होत आहे.

रेल्वे स्टेशन समोरच पे अँड पार्कची व्यवस्था असूनही घाईघाईत गाड्या पकडणारी प्रवासी मंडळी मिळेल त्या ठिकाणी आणि कशाही प्रकारे टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्स पार्क करून जातात. या सर्वांचा त्रास दिवसभर बाजारहाट व अन्य कामासाठी येणा-या प्रवासी, नागरिकांना होतो आहे. सध्याच्या पार्किंग व्यवस्थेत अनेक त्रुटी असल्याने प्रवासी तेथे वाहने पार्क करण्यास टाळाटाळ करीत आहेत. प्रवासी संख्येत झालेल्या प्रचंड वाढीमुळे सुसज्ज पार्किंगची व्यवस्था असणे ही काळाची गरज आहे.

काही मुजोर प्रवासी आपली वाहने फूटपाथपर्यंत आणून लावतात आणि मग गर्दीच्या वेळी गाडीच्या हँडलचा फटका लागल्याने हाताला दुखापत झाली आहे; शिवाय मानसिक त्रास होतो तो वेगळाच अशी येथील संदिप वझे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title: Ganesh Festival 2017 Mumbai Ganesh Utsav