गणेश मंडपांना तात्काळ "एनओसी' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

मुंबई - गणेशोत्सवाच्या मंडप परवान्यांसाठी मंडळांनी केलेल्या ऑनलाइन अर्जांवर संबंधित पोलिस ठाणे गतवर्षीची परवानगी पाहून त्वरित ना-हरकत प्रमाणपत्र देतील. वेळ पडल्यास अधिकारी स्वतः महापालिका कार्यालयात हजर राहून ना-हरकत प्रमाणपत्र देतील, असा निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि पोलिसांच्या बैठकीत घेण्यात आला. 

ही बैठक सोमवारी नायगाव येथील पोलिस सभागृहात झाली. पोलिस आयुक्त सुबोध जयस्वाल बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. गतवर्षी ज्या मंडळांना परवानगी दिली आहे, त्यांना यंदाही त्वरित परवानगी देण्यात येईल. ध्वनिक्षेपकासाठी एक खिडकी योजनेद्वारे परवानगी दिली जाईल. आगमन आणि विसर्जन मिरवणुकीची परवानगीही त्वरित देण्यात येईल, असे या बैठकीत ठरले. सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक मंडळ 10 जबाबदार गणसेवकांची नेमणूक करील. बॉंबसदृश परिस्थिती आणि दहशतवादी कारवाया हाणून पाडण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाणे गणसेवकांना प्रशिक्षण देतील. अशा एक लाख गणसेवकांची फौज गणेशोत्सव आणि अन्य उत्सवांमध्ये पोलिसांना सहकार्य करील. 

ध्वनिक्षेपक परवानगी 
मुंबई जिल्हाधिकारी आणि उपनगर जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चेनुसार यंदा 14, 17, 22, 23 सप्टेंबर या चार दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकास दिवसा 55 आणि रात्री 45 डेसिबलनुसार वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Web Title: Ganesh mandal is immediately NOC