मोठी बातमी! मुंबईतल्या 'या' मंडळानं गणेशोत्सव केला रद्द..कोरोनामुळे उचललं पाऊल.. 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

कोरोनाच्या परिस्थिती या गर्दीवर कसे नियंत्रण मिळवायचे व शारिरिक अंतर कसे राखायचे असा पेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळेच मुंबईच्या एका गणेशोत्सव मंडळानं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई: कोरोनाचे सावट येऊ घातलेल्या गणेशोत्सवावर आहे. गणेशोत्सवात गणपतीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात. कोरोनाच्या परिस्थिती या गर्दीवर कसे नियंत्रण मिळवायचे व शारिरिक अंतर कसे राखायचे असा पेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळेच मुंबईच्या एका गणेशोत्सव मंडळानं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

दर्शनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी वडाळा राम मंदिर जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांने या वर्षी भाद्रपदातील गणेश चतुर्थीला गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ऐवजी गणेशोत्सव माघ महिन्यातील २०२१ मधील गणेश चतुर्थीला साजरा करण्यात येणार आहे.

हेही वाचा: अख्खी मुंबई कोरोनाच्या 'कैदेत', संशयित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
 

कोरोनाच्या परिस्थिती गणेशोत्सव साजरा करण्याबाबत राज्य सरकारकडून अनेक बंधन येण्याची शक्यता आहे. तसेच सण उत्सवामध्ये मास्क लावणे, सॅनिटायझर, शारिरिक अंतर राखणे या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. जीएसबी वडाळा येथे ११ दिवसांचा गणेशोत्सव असतो. या दरम्यान लाखोंनी भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी असते. कोरोना परिस्थिती गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे. गर्दी झाल्याने कोरोना संसर्ग होऊ शकतो. सुरक्षेच्या दृष्टीने जीएसबी वडाळा गणेशोत्सव मंडळाने या वर्षी गणेशोत्सव साजारा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
याबाबत मंडळाने पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.  परिस्थितीवर बैठकीत चर्चा करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांना एकमताने गणेशोत्सव रद्द करून त्या ऐवजी २०२१ मध्ये माघ महिन्यातील गणेश जयंतीला उत्सव करण्याचे ठरवले आहे. 

हेही वाचा: "ईद साजरी करण्यापेक्षा कर्तव्य होतं महत्वाचं"; वाचा काही मुस्लिम डॉक्टरांच्या भावना...
 
"कोरोनामुळे आपल्या आजूबाजूची परिस्थिती खूप वाईट आहे. अशा परिस्थिती शारिरिक अंतर राखणे गरजेचे आहे. गणेशोत्सवमध्ये त्यावर कंट्रोल ठेवणे मंडळांच्या स्वयंसेवकांनाही शक्य होणार नाही. मंडळाच्या स्वयंसेवक आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी आम्ही हा महत्त्वपूर्ण निर्णय़ घेतला. उत्सव पुढच्यावर्षी माघमध्ये नेहमीप्रमाणे साजरा करू" असं जीएसबी गणेशोत्सव मंडळाच्या उल्हास कामत यांनी म्हंटलंय.  

ganesh mandal in mumbai has cancel ganeshotsav 2020 read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh mandal in mumbai has cancel ganeshotsav 2020 read full story