ऐरोली - माजी मंत्री गणेश नाईक यांनी आज (ता. २९) सकाळी सर्वांत आधी कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक महाविद्यालयात सहपरिवार जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. या वेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी नाईक, मोठा मुलगा माजी खासदार संजीव नाईक, लहान मुलगा आमदार संदीप नाईक, पुतण्या माजी महापौर सागर नाईक, भाऊ माजी नगरसेवक ज्ञानेश्वर नाईक, सुना कल्पना संजीव नाईक, कल्याणी संदीप नाईक, काजल सागर नाईक, पुतण्या संतोष तांडेल व परिवारातील इतर सदस्य उपस्थित होते.
या वेळी गणेश नाईक म्हणाले, ही निवडणूक म्हणजे कासव व सशाच्या गोष्टीसारखी आहे. अतिआत्मविश्वासाने झोपून राहिलेल्या सशाला हरवून कासवाच्या विजयाची घोषणा या निवडणुकीतून होणार आहे; मात्र या गोष्टीतील ससा म्हणजे शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे असून आनंद परांजपे हे कासव आहेत. धीम्या गतीने चालूनसुद्धा त्यांचाच विजय होईल, असे स्पष्टीकरण द्यायला ते विसरले नाहीत.
काही संघटनांनी गावठाणात बहिष्काराची हाक दिली असल्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार न टाकता मतदान करावे, असे आवाहन केले असून त्याला कोणीही विरोध दर्शवला नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.