भिवंडीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

भिवंडीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

भिवंडी - जीवे मारण्याची धमकी देत एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चौघा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार भिवंडीत घडला आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौघा आरोपींविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तिघा जणांना अटक केली आहे; तर चौथा आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

भुल्लन वली मोहम्मद खान (५८), शाहनवाज खान (१९), रिजवान खान (२३) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत; तर फिरोज सिद्दिकी असे फरार आरोपीचे नाव आहे. १३ वर्षीय पीडिता येथील शांतिनगर भागात वास्तव्यास आहे. आरोपी भुल्लनही याच परिसरात राहतो. तो सौंदर्य प्रसाधने विकण्याचा व्यवसाय करायचा. पीडिता त्याच्याजवळून सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू विकत घेत असे. या माध्यमातून पीडितेशी ओळख निर्माण करत त्याने एके दिवशी तिला आपल्या घरी बोलावले. त्यानंतर कुटुंबियांसह तुला ठार मारू अशी धमकी देत भुल्लन याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडितेवर हा बलात्कार होताना शाहनवाज, रिझवान आणि फिरोज या तिघांनी पाहिले. त्यांनीही पीडितेला अशाच प्रकारे धमकावून तिच्यावर बलात्कार केला. तिने हा प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून या तिघा आरोपींना अटक केली; मात्र फिरोज हा फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या तिन्ही आरोपींना पोलिसांनी शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com