भिवंडीत तरुणीवर सामूहिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

भिवंडी - प्रियकराला गावठी कट्टा आणि चाकूचा धाक दाखवून पाच जणांनी तरुणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री भिवंडी तालुक्‍यातील पोगाव पाईपलाईन येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना अटक केली. 

भिवंडी - प्रियकराला गावठी कट्टा आणि चाकूचा धाक दाखवून पाच जणांनी तरुणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री भिवंडी तालुक्‍यातील पोगाव पाईपलाईन येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना अटक केली. 

शहरातील शांतीनगर, आझादनगर येथे राहणारा इम्रान सिकंदर खान (वय २६) हा त्याच्या २० वर्षांच्या मैत्रिणीसोबत दुचाकीने पोगाव पाईपलाईन येथे गेला होता. रात्री ९.३० वाजता घरी परतताना त्यांना पाच नराधमांनी अडवले. इम्रानला गावठी कट्टा व चाकूचा धाक दाखवून त्यांनी तरुणीवर अत्याचार केला. या घटनेने भयभीत झालेल्या इम्रानने प्रेयसीसोबत भिवंडी तालुका पोलिस ठाणे गाठून या घटनेची माहिती दिली. तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास चौगुले आणि उपनिरीक्षक चेतन पाटील यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी पंचनामा केला. पोलिसांनी आजूबाजूच्या वस्तीत आरोपींचा शोध घेतला. येवई हद्दीतील किशोर रघुनाथ लाखात (वय १९) याला ताब्यात घेऊन चौकशी केला असता, त्याने चौघांसह अत्याचार केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून गुरुनाथ गोपाल बारी (२३, रा. येवई), हर्षद हिरामण मटले (१९, रा. चाविंद्रा), अविनाश पुंडलिक जाधव (२४, रा. शेलार), गणेश पवार (२०, रा. शेलार) यांना अटक केली. बुधवारी त्यांना न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: Gang rape on the girl in bhiwandi