Mumbai Crime: मुंबई हादरली! गळ्याला चाकू लावला अन् नराधमांनी 15 वर्षीय मुलीवर केला सामूहिक लैंगिक अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Crime

Mumbai Crime: मुंबई हादरली! गळ्याला चाकू लावला अन् नराधमांनी 15 वर्षीय मुलीवर केला सामूहिक लैंगिक अत्याचार

मुंबईतील मुलुंड परिसरातून संतापजनक घटना समोर आली आहे.15 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. चाकूचा धाक दाखवून आईला जिवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे.

या घटनेमुळे मुलुंडमध्ये खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहे.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता कलम आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 21 वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या आरोपीचा पोलिस शोध घेण्यासाठी परराज्यात रवाना झाले आहे.

दरम्यान गुंगीच औषध देऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे एफआयआरमध्ये लिहण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये महिला, अल्पवयीन मुली यांच्याबाबतच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीवर दोघा आरोपींनी चाकूचा धाक दाखवत आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी देत, तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. मुलुंड पोलिसांनी सामुहिक बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपास करत आहेत.