धक्कादायक ! मुंबईत 36 वर्षीय पुरुषावर सामुहिक बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

36 वर्षीय पुरुषाला बेशुद्ध करुन त्याच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना नवी मुंबईतील वाशी येथे घडली आहे.

मुंबई : 36 वर्षीय पुरुषाला बेशुद्ध करुन त्याच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना नवी मुंबईतील वाशी येथे घडली आहे.  पीडित व्यक्ती घरी जात असताना धुम्रपान करण्यासाठी थांबला असता पाच जणांनी त्यांच अपहरण करत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

पीडित पुरुषाचं अपहरण करुन  पीडित व्यक्तीला एका अक्षात स्थळी नेण्यात आले. त्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली आणि नंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आरोपींनी पीडित पुरुषावर भयानक पद्धतीने अत्याचार केले असून पिडित व्यक्तीच्या अनेक सर्जरी कराव्या लागणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. आरोपींना अजून पकडण्यात आले नसून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडित पुरुषावर अनेक शस्त्रक्रिया केल्या असून सध्या त्याला डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आलं आहे, पोलिसांनी पीडित पुरुषाच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून कलम ३७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आम्ही आरोपींची माहिती घेतली असून पीडितने दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांचा शोध घेतला जात आहे. आम्ही जवळच्या परिसरात असणारे सीसीटीव्हीदेखील तपासत आहोत. लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पीडिताने दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी 25 ते 30 वयोगटातील असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gangrape On 36 year Man In Navi Mumbai