भाजप गुंडांचा पक्ष नाही का?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

उल्हासनगर - जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या पप्पू कलानीला भाजपने पोस्टर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंक्तीत बसवले. त्यावरून भाजप गुंडांचा पक्ष नाही का, असा सवाल काँग्रेसचे निरीक्षक सुभाष कानडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

उल्हासनगर - जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या पप्पू कलानीला भाजपने पोस्टर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंक्तीत बसवले. त्यावरून भाजप गुंडांचा पक्ष नाही का, असा सवाल काँग्रेसचे निरीक्षक सुभाष कानडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

भाजपने त्यांचा पक्ष गुंडांचा असल्याचे सिद्ध केले आहे. अशा पक्षाला निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन कानडे यांनी केले आहे. काँग्रेसचा वचननामा प्रसिद्ध करताना ते म्हणाले की, निवडणूक अवघ्या नऊ दिवसांवर आली आहे. असे असताना काँग्रेस वगळता अन्य कोणत्याही पक्षाने वचननामा प्रसिद्ध केलेला नाही. नीलेश पेंढारी, जिल्हा अध्यक्ष जयराम लुल्ला, स्वाभिमान संघटनेचे ठाणे जिल्हा संघटक रोहित साळवे, गटनेत्या जया साधवानी व राधाचरण करोतिया या वेळी उपस्थित होते.

अवघे ११ नगरसेवक असलेल्या भाजपमध्ये २१ नगरसेवक असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीन होतो म्हणजेच तो आत्महत्या करतो, अशी टीका या वेळी काँग्रेस निरीक्षक नीलेश पेंढारी यांनी केली. शहरात माफिया राज असल्यामुळे उल्हासनगरचा उल्हास लुप्त झाल्याचे पेंढारी म्हणाले. पालिका क्षेत्रात तब्बल १८५ आरक्षित भूखंडांपैकी पालिकेच्या ताब्यात फक्त २१ आहेत; उर्वरीत १६७ वर अतिक्रमण झालेले आहे. शहरात एकही मैदान सुस्थितीत नाही. आमदार ज्योती कलानी व बालाजी किणीकर यांच्या श्रेयवादातून  दशहरा मैदानाच्या तालुकास्तरीय क्रीडासंकुलाचे काम थांबले आहे. व्ही.टी.सी. मैदानाला बाळासाहेब क्रीडासंकुल नाव देऊन तीन वर्षे झाली; पण क्रीडासंकुलाचे काम सुरू झालेले नाही. खेळ संस्कृतीच्या विकासासाठी शिवसेना आणि भाजपला सत्तेपासून लांब ठेवा, असे आवाहन स्वाभिमाने संघटनेचे रोहित साळवे यांनी केले.

काय आहे वचननाम्यात?
मोफत व स्वच्छ पाणी, खड्डेमुक्त काँक्रीटचे रस्ते, आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न, विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क संगणकीय शिक्षण, धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी विशेष प्रयत्न, दशहरा आणि व्हीटीसी मैदानाचा विकास, सिटीजन चार्टरचे पालन करण्यासाठी लोकपाल समितीचे गठन,  समस्या सोडवण्यासाठी वाॅर्डनिहाय लोकसेवा केंद्र आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: gangsters in BJP party ulhasnagar