esakal | गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी 'RTPCR' चाचणी रद्द करा; आंदोलनात मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Thane Strike

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी 'RTPCR' चाचणी रद्द करा; आंदोलनात मागणी

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त (Ganpati festival) कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना (Konkan commuters) आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) बंधनकारक केल्याने कोकणवासियांकडून याला विरोध दर्शविला आहे. मागील तीन महिन्यांपासून चाकरमानी रेल्वे, एसटीचे आरक्षण (reservation) करतेवेळी राज्य सरकारकडून (Maharashtra government) कोणतीही नियमावली जाहिर केली नाही. तर, काही दिवस बाकी असताना आरटीपीसीआर चाचणी करण्याची बंधने घातली गेली. गणेशोत्सानिमित्त कोकणातील मुळगावी जाण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची बंधने रद्द करण्याच्या विरोधात सोमवारी, (ता.6) रोजी कोकण रेल्वे प्रवासी संघाकडून ठाणे (thane) रेल्वे स्थानकात आंदोलन (strike) केले.

कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाकडून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सोमवारी, (ता.6) रोजी सकाळपासून ठाणे स्थानकाला पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल यांचा कडक बंदोबस्त असल्याने छावणीचे स्वरूप आले होते. त्यानंतर आंदोलकांनी अधिकाऱ्यांशी रितसर चर्चा करून त्यांच्या चर्चेनुसार संघटनेचे निवेदन वरिष्ठांपर्यंत पोहचवू असे सांगण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याकरिता सरकारकडून नवे नियम आणि अटी घातल्या आहेत. सरकारकडून या निर्णयाचा कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समितीकडूनही विरोध दर्शविला. सध्या राज्यात राजकीय कार्यक्रम होत आहे. त्यांच्या सभा आणि मेळाव्याना सरकारकडून अनुमती दिली जाते. मात्र, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याकरिता नियमांचे विघ्न घातले आहे. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणीची बंधने रद्द करण्याची मागणी कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समितीने केली.

कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघटनेच्यावतीने ठाणे स्थानकात आरटीपीसीआर चाचणी रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. या आंदोलनात संघटनेतील सर्व पदाधिकारी आणि सभासद आवर्जून उपस्थित होते. आतापर्यंत सर्वप्रकारे शासन आणि प्रशासन यांना रितसर पत्रव्यवहारही करण्यात आला. परंतु, कोकणवासियांना कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. कोकणातील सर्व राजकीय नेते यांचेही कुठल्याही प्रकारची आश्वासन मिळाले नाही. राजकीय दौरे, मेळावे तसेच जत्रा यांना सशर्त परवानगी मिळते. मग कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना का सक्ती, असा प्रश्न कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे प्रमुख राजू कांबळे यांनी उपस्थित केला.

loading image
go to top