esakal | कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खुशखबर; 72 गणपती स्पेशल ट्रेन
sakal

बोलून बातमी शोधा

kokan train

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खुशखबर; 72 गणपती स्पेशल ट्रेन

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : गणेशोत्सवासाकरिता (Ganpati Festival) कोकणात (Kokan) जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खुशखबर आहेत. कोकणात जाणाऱ्यांची प्रवाशांची (Kokan Travelers) तुफान गर्दी लक्षात घेता. मध्य रेल्वेने (Central Railway) 72 गणपती स्पेशन ट्रेन (Special Train) चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाकरिता कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी काही प्रमाणात सोय होणार आहेत. या गणपती स्पेशन ट्रेन (Ganpati Special Train) सीएसएमटी ते सावंतवाडी, सीएसएमटी -रत्नागिरी,पनवेल-सावंतवाडी आणि पनवेल -रत्नागिरी दरम्यान या स्पेशल गाड्या चालवण्यात येणार आहेत. ( Ganpati seventy two Special Train For kokan people decision by Central railway)

सीएसएमटी-सावंतवाडी राेड स्पेशल ट्रेन

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी-सावंतवाडी राेड स्पेशल ट्रेनच्या 36 फेऱ्या हाेणार आहेत. 01227 सीएसएमटी-सावंतवाडी ट्रेन 5 ते 22 सप्टेंबर दरम्यान दरराेज रात्री 12.20 वाजता सुटून दुपारी 2 वाजता सावंतवाडीला पाेहाेचणार आहे. तर परतीकरिता 01228 ट्रेन दरराेज दुपारी 2.40 वाजता निघून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी पहाटे 4.25 वाजता येईल. या गाडीला दादार,ठाणे,पनवेल,राेहा,माणगाव,वीर,खेड,चिपळुण,सावर्डे,अरवली राेड,संगमेश्वर राेड,रत्नागिरी,अडवली,वलिवडे,राजापुर राेड,वैभववाडी,कणकवली,नांदगाव,सिंधुदुग्र आणि कुडाळा स्थानकात थांबा दिला आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळं निर्बंध शिथिलतेची शक्यता धूसर - BMC

सीएसएमटी -रत्नागिरी स्पेशल ट्रेन

सीएसएमटी -रत्नागिरी स्पेशल ट्रेनच्या दहा फेऱ्या हाेणार असून आठवड्यातून ही गाडी दाेन वेळा धावणार आहे. 01229 सीएसएमटी-रत्नागिरी स्पेशल ट्रेन 6 ते 20 सप्टेंंबर दरम्यान दर साेमवारी आणि शुक्रवारी दुपारी 1.10 वाजता सुटून रत्नागिरीला त्याच दिवशी रात्री 10.35 वाजता येईल. परतीकरिता 01230 ट्रेन 9 ते 23 सप्टेंबर दरम्यान दर रविवार आणि गुरुवारी रात्री 11.30 वाजता निघून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी सकाळी 8.20 वाजता येईल.यागाडीला दादर,ठाणे,पनवेल,राेहा,माणगाव,वीर,खेड,चिपळुण,सावर्डे,अरवली राेड,संगमेश्वर राेड स्थानकात थांबा दिला आहे.

पनवेल-सावंतवाडी राेड स्पेशल ट्रेन

पनवेल-सावंतवाडी राेड स्पेशल ट्रेन आठवड्यातून तीन वेळा धावणार असून गाडीच्या 16 फेऱ्या हाेणार आहेत. 01231 पनवेल-सावंतवाडी ट्रेन 7 ते 22 सप्टेंबर दरम्यान दर मंगळवार,बुधवार आणि शनिवारी सकाळी 8 वाजता सुटून रात्री 8 वाजता सावंतवाडीला पाेहाेचणार आहे.तर परतीकरिता 01232 ट्रेन त्याच दिवशी रात्री 8.45 वाजता निघून पनवेलला दुसऱ्या दिवशी सकाळी 7.10 वाजता येईल. या गाडीला राेहा,माणगाव,वीर,खेड,चिपळुण,सावर्डे,अरवली राेड,संगमेश्वर राेड,रत्नागिरी,अडवली,वलिवडे,राजापुर राेड,वैभववाडी,कणकवली,नांदगाव,सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकात थांबा दिला आहे.

पनवेल -रत्नागिरी स्पेशल ट्रेन

पनवेल -रत्नागिरी स्पेशल ट्रेनच्या दहा फेऱ्या हाेणार आहेत. 01233 पनवेल-रत्नागिरी स्पेशल ट्रेन 9 ते 23 सप्टेंंबर दरम्यान दर गुरुवार आणि रविवारी सकाळी 8 वाजता सुटून रत्नागिरीला त्याच दिवशी दुपारी 3.40 वाजता पाेहचेल. परतीकरिता 01234 ट्रेन दर साेमवार आणि शुक्रवारी रात्री 11.30 वाजता निघून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता येईल. यागाडीला राेहा,माणगाव,वीर,खेड,चिपळुण,सावर्डे,अरवली राेड,संगमेश्वर राेड स्थानकात थांबा दिला आहे. या गाड्यांना एसी थ्री टायर कम एसी टु टायरचा एक काेच,एसी थ्री टायरचे चार ,स्लीपर क्लासचे 11 तर सेकण्ड सीटिंंग क्लासचे सहा काेच असतील.

loading image