esakal | कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या संकुलांवर महापालिका करणार कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या संकुलांवर महापालिका करणार कारवाई

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : कचऱ्यावर प्रक्रिया (Garbage ) न करणाऱ्या संकुलांवर (building complex) आता ऑनलाईन (online) नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका (bmc) डॅश बोर्ड (dashboard) तयार करणार आहे. रोजच्या रोज कचऱ्याचा हिशोब ठेवून प्रक्रिया न करणाऱ्या संकुलांवर तत्काळ कारवाई (BMC Action) करण्यात येणार आहे.

हेही वाचा: दिवाळीच्या सुमारास 'जिओफोन नेक्स्ट' बाजारात; जिओ गुगलची घोषणा

महानगरपालिकेने काही वर्षांपुर्वी रोज 100 किलो पेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या तसेच 20 हजार चौरस मिटर पेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या संकुलांमध्ये ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे.यासाठी महानगर पालिकेने हजारो संकुलांवर दंडात्मक कारवाईही केली आहे. गेल्या वर्षी पर्यंत 3 हजार 125 संकुलांत अशी प्रक्रिया करण्यात येत होती. मात्र, लॉकडाऊनमध्ये हे प्रमाण निम्म्यापर्यंत आले असल्याची शक्यता आहे.

महानगरपालिकेने आता पुन्हा या नियमांची कठोर अमंलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुन्हा संकुलातील कचरा प्रक्रिया केंद्रांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.अशा प्रकारे कचऱ्याचे वर्गिकरण करुन त्यावर प्रकि्रया होत नसेल तर संबंधीत संकुलाना 10 ते 50 हजार रुपयांपर्यंतचा दंड तसेच न्यायालयीन कारवाई करण्याचीही तरतूद आहे. संकुलातील कचरा प्रक्रियेचा नियमीत आढावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी डॅशबोर्ड तयार करण्यात येईल असे पालिकेच्या उपायुक्त डॉ.संगिता हसनाळे यांनी सांगितले.

कचऱ्यावर प्रक्रिया

-कचऱ्याचे निर्मीतीच्या ठिकाणी वर्गीकरण,प्रक्रिया होऊ लागल्यावर डंपिंगवर येणारा कचरा कमी झाला आहे.पुर्वी रोज नऊ हजार मेट्रीक टन पर्यंत कचरा डंपिंगवर येत होता.ते प्रमाण आता साडे सहा हजार मेट्रीक टन पर्यंत खाली आले आहे.

-उगमस्थानी कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या संकुलांना मालमत्ता करातील सर्वसाधारण करात 10 टक्क्यांची सुट देण्यात येणार आहे.

-कचऱ्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया केल्यास कचऱ्याची डंपिंग पर्यंत वाहतुक करण्याची समस्या कमी होते.

loading image
go to top