Thur, June 1, 2023

Mumbai News : जुहूमधल्या एका बागेतील झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह परिसरात खळबळ
Published on : 7 February 2023, 3:39 pm
मुंबई : मंगळवारी मुंंबई येथील जुहू परिसरात एका बागेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. स्थानिक जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवून ताब्यात घेतला.
त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला असल्याची माहिती जुहू पोलिसांकडून मिळत आहे. दरम्यान अजूनही मृतदेहाची ओळख पटली नाही. ही हत्या आहे की, आत्महत्या याबाबत शवविच्छेदन अहवालानंतरच माहिती मिळू शकणार आहे.
जुहू पोलिसांनी आकस्मिक गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. जुहू पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. जुहू बीच हा गजबजलेला परिसर आहे. अशातच अज्ञात मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.