गॅसचा काळाबाजार डोंबिवलीत उघडकीस 

गॅसचा काळाबाजार डोंबिवलीत उघडकीस 

डोंबिवली - गॅसच्या वाढत्या किमतींमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असतानाच डोंबिवलीत घरगुती सिलिंडरमधून गॅसची चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरलेला गॅस कमर्शियल सिलिंडरमध्ये भरून बाजारात विकला जात होता. कल्याण क्राईम ब्रॅंचने डोंबिवलीतील एका गॅस गोडाऊनवर छापा टाकत याचा पर्दाफाश केला. या प्रकारामुळे सर्वच गॅस एजन्सींच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

डोंबिवली पूर्वेकडील पेंढारकर महाविद्यालयाच्या पाठीमागे हे गॅस गोडाऊन आहे. या ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरमधून चोरी केली जात असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रॅंचला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी गोडाऊनवर छापा टाकण्यात आला. याप्रकरणी गॅस एजन्सीमधील 17 लोकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी सुरू आहे. गॅस एजन्सीचा सुपरवायझर फरार झाला आहे; मात्र या प्रकाराबद्दल आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगत दोषींवर कारवाई करण्याची मागणी एजन्सीच्या चालकाने केली आहे. 

अशी व्हायची चोरी! 
घरगुती सिलिंडरमधील गॅस एका लोखंडी नळीच्या मदतीने काढून तो कमर्शियल सिलिंडरमध्ये भरला जात होता. विशेष बाब म्हणजे गॅस माफिया अवघ्या 10 सेंकदात 2 किलो गॅसची चोरी सहज करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हा कमर्शियल गॅस चढ्या भावाने बाजारात विकण्याचा काळा धंदा डोंबिवलीत सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी डोळे विस्फारले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com