सायन रूग्णालय परिसरात गॅस गळती; सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

मिलिंद तांबे | Friday, 27 November 2020

सायन रुग्णालयाच्या परिसरात गॅस गळती झाल्याची घटना घडली. रूग्णालयातूल एका इमारतीबाहेरील लिफ्टच्या कामासाठी खड्डा खोदतांना महानगर गॅस निगमच्या पाइपलाइनला धक्का लागून त्यामधून गॅसगळती सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई : सायन रुग्णालयाच्या परिसरात गॅस गळती झाल्याची घटना घडली. रूग्णालयातूल एका इमारतीबाहेरील लिफ्टच्या कामासाठी खड्डा खोदतांना महानगर गॅस निगमच्या पाइपलाइनला धक्का लागून त्यामधून गॅसगळती सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. या गळतीची माहिती मिळताच रूग्णालयातील सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून तात्काळ संबंधित एजन्सीला पाचारण केलं.

हेही वाचा - पुन्हा लॉकडाऊनबाबत अफवांचे पीक! समाज माध्यमांवरील चर्चांमुळे व्यापारी संभ्रमात

संबंधित एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी गॅस गळती थांबवली व होणारा मोठा अनर्थ टळला. सायन रुग्णालयातील आरएमओ क्वार्टर्सच्या लिफ्टच्या आर्थिंगसाठी रुग्णालयाच्या गेट क्रमांक एकजवळ  काही कामगार खड्डा खोदत होते. त्यावेळी जमिनीखालून गेलेल्या महानगर गॅस निगमच्या पाइपलाइनला धक्का लागला. फुटलेल्या पाइपलाइनमधून गॅस बाहेर आल्याने परिसरात उग्र वास पसरला. कामगारांनी मात्र याबाबत मौन बाळगले. काही सुरक्षारक्षकांना गॅसचा वास आल्याने त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

Advertising
Advertising

हेही वाचा - पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत! चक्रीवादळात तडाख्यानंतर सरकारचे दुर्लक्ष 

सुरक्षारक्षकांनी तात्काळ महानगर गॅस कंपनी, अग्निशमन दल, रूग्णालय देखभाल विभागाशी संपर्क करून माहिती दिली. महानगर गॅस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सावधानता बाळगत ती आधी जागा मोकळी केली. त्याठिकाणी गर्दी जमू न देता फुटलेल्या पाइपलाइनमधून होणारी गॅस गळती बंद केल्याने पुढील धोका टळला.

Gas leak in Sion Hospital area The vigilance of the security guards averted the disaster 

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )