मुंबईतील विविध भागात गॅस गळती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

मुंबईतील काही उपनगरांमधून महानगर गॅसच्या वाहीतून ज्वलनशील घरगुती इंधनाची गळती होत असल्याच्या तक्रार स्थानिक नागरिकांडून येत होत्या. या तक्रारीची दखल घेऊन अग्निामन दलाचे जवान तत्काळ ठिकठिकाणी पोहचले असून, वाहिन्यांची तपासणी करत आहेत.

मुंबई : मुंबईतील काही उपनगरांमधून महानगर गॅसच्या वाहीतून ज्वलनशील घरगुती इंधनाची गळती होत असल्याच्या तक्रार स्थानिक नागरिकांडून येत होत्या. या तक्रारीची दखल घेऊन अग्निामन दलाचे जवान तत्काळ ठिकठिकाणी पोहचले असून, वाहिन्यांची तपासणी करत आहेत.

तसेच, महानगर गॅसच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली होती. तर रात्री राष्ट्रीय केमिकल फल्टीलायझर कंपनीच्या परिसरातही गॅसचा वास येत असल्याने तेथेही बंब रवाना करण्यात आले. मात्र, रात्री उशिरापर्यंत गळती सापडू शकली नाही.

गोवंडी, चेंबूर, पवई, चांदिवली या परिसरातून महानगर गॅस कंपनीच्या वाहीतून गळती होत असून, घरगुती इंधनाचा वास येत असल्याचे तक्रारी स्थानिक नागरीकांकडून महानगर पालिकेच्या आपात्कालीन व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाकडे आल्या. त्यानुसार अग्निशमन दलाचे बंब ठिकठिकाणी पोहचले. त्यांनी तत्काळ गळती शोधण्यास सुरवात केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत गळती सापडली नव्हती.

त्यातच माहूल येथील राष्ट्रीय केमिकल फल्टीलायझर कंपनीच्या परिसरातही गॅसचा वास येत असल्याची तक्रार आली. तेथेही अग्निशमन दलाचे बंद दाखल झाले होते. मात्र,रात्री उशिरापर्यंत गळती सापडली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gas Leakage in Mumbai Various Areas