‘अधिकारी ब्रदर्स’ या समूहाचे सर्वेसर्वा गौतम अधिकारी यांचं निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

गौतम अधिकारी यांनी त्यांच्या मालिकांत प्रामुख्याने नवकलाकारांना संधी दिली. मराठी मालिकांच्या सर्वाधिक भागांचे दिग्दर्शन करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे. त्यांनी आपला भाऊ मार्कंड याच्या साथीने सब टीव्ही या हिंदी मनोरंजन चॅनेलची स्थापना केली

मुंबई : टेलिव्हिजन क्षेत्रातील दिग्गज नाव आणि ‘अधिकारी ब्रदर्स’ या समूहाचे सर्वेसर्वा गौतम अधिकारी यांचं आज (शुक्रवार) सकाळी निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. आज सकाळी ११ च्या दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

गौतम अधिकारी यांनी त्यांच्या मालिकांत प्रामुख्याने नवकलाकारांना संधी दिली. मराठी मालिकांच्या सर्वाधिक भागांचे दिग्दर्शन करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे. त्यांनी आपला भाऊ मार्कंड याच्या साथीने सब टीव्ही या हिंदी मनोरंजन चॅनेलची स्थापना केली. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Web Title: gautam adhikari no more