गीता गवळींचा भाजपला पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

मुंबई / नवी मुंबई - अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. वांद्रे पश्‍चिमेकडील अपक्ष नगरसेविका मुमताज खान यांनीही भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ 84 वर पोचले आहे. दरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या मध्यस्थीमुळे गवळी यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

दहा वर्षांपासून शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या गवळी यांनी गुरुवारी शिवसेना भवनमध्ये ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदार अनिल देसाई यांच्याशी चर्चा केली होती. त्या वेळी गवळी यांनी आरोग्य समितीचे अध्यक्षपद आणि स्थायी समितीचे सदस्यपद देण्याची मागणी केली. शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने गवळी यांनी विचार करून निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले होते. त्या शिवसेना भवनात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "वर्षा' बंगल्यावर चर्चेसाठी बोलावले. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर गवळी यांनी भाजपला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. याबाबत अरुण गवळींशी चर्चा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या गटाची कोकण आयुक्तांकडे नोंदणी
शिवसेना आणि कॉंग्रेसपाठोपाठ भाजपनेही शुक्रवारी कोकण आयुक्तांकडे आपल्या नगरसेवकांच्या गटाची नोंदणी केली. भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांबरोबरच त्या पक्षाला पाठिंबा देणाऱ्या अभासेच्या नगरसेविका गीता गवळी आणि अपक्ष नगरसेविका मुमताज खान याही या वेळी उपस्थित होत्या. आपण "पारदर्शक' कारभारासाठी महापालिकेत काम करणार असल्याचे गवळी यांनी याप्रसंगी सांगितले; मात्र मुबईत कोणत्या पक्षाचा महापौर होईल, याबाबत त्या साशंक वाटल्या.

दरम्यान, गवळी आणि शेख यांच्या पाठिंब्यामुळे भाजपचे संख्याबळ 84 वर पोचले असले, तरी आकडेवारी गाठणे आमचे लक्ष्य नसून "पारदर्शक' कारभारास आमचे प्राधान्य असेल. "पारदर्शक' कारभारासाठी जे आमच्यासोबत येतील, त्यांना सोबत घेऊन जाऊ, असे भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी सांगितले.

Web Title: geeta gawli support to bjp