गीता जैन शिवसेनेत, भाजपाला बॅक टू बॅक मोठा धक्का; मातोश्रीवर पार पडला पक्षप्रवेश

सुमित बागुल
Saturday, 24 October 2020

गीता जैन यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे भाजपाला एका मागोमाग एक मोठे धक्के बसताना पाहायला मिळतायत.    

मुंबई : कालच भाजपचे जुने जाणते नेते एकनाथ खडसे यांनी आपला ४० वर्षांचा भाजपसोबतचा प्रवास मागे सारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. त्यामागोमाग आज राजकारणातील आणखीन एक मोठं नाव शिवसेनेत प्रवेश करताना पाहायला मिळालं. हे नाव आहे मुंबई आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमधील महिला राजकारण्याचं. गीता जैन यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय. यानिमित्ताने भाजपाला बॅक टू बॅक मोठा धक्का लागल्याचं पाहायला मिळतंय. 

मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार गीता जैनयांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

महत्त्वाची बातमी :  महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

गीता जैन या पूर्वाश्रमीच्या भाजपवासी, मात्र विधानसभेवेळी भाजपातील अंतर्गत चढाओढीमुळे गीता जैन यांना तिकीट नाकारलं गेलं. गीता जैन यांच्या ऐवजी फडणवीसांचे जवळचे मानले जाणारे नरेंद्र मेहता यांना तिकीट देण्यात आलं. तिकीट न मिळाल्यामुळे गीता जैन यांनी अपक्ष म्हणून मीरा भाईंदर मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत जैन यांनी नरेंद्र मेहता यांना पराभवाची धूळ चारली होती. निववडणूक जिंकल्यानंतर गीता जैन यांनी भाजपाला समर्थन दिलं होतं. 

मात्र आज गीता जैन यांनी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केलाय. गीता जैन यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे भाजपाला एका मागोमाग एक मोठे धक्के बसताना पाहायला मिळतायत.    
 

geeta jain joins shivsena in the presence of uddhav thackeray at matoshree


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: geeta jain joins shivsena in the presence of uddhav thackeray at matoshree