भूगोलातील चुकांबद्दल दोषींना अटक करा - विखे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

मुंबई - दहावीच्या नवीन भूगोल पाठ्यपुस्तकात भारताचा सदोष नकाशा आणि राष्ट्रध्वज प्रकाशित करण्यात आला आहे. पुस्तकातील भारताच्या नकाशातून जम्मू व काश्‍मीरचा मोठा भूभाग देशाच्या सीमेबाहेर दाखवण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणी सरकारने संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी केली.

"सकाळ'मध्ये दहावीच्या भूगोल पुस्तकामधील गंभीर चुकांचे वृत्त आज (ता. 26) प्रसिद्ध केले आहे. विखे पाटील यांनी या संतापजनक घटनेबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने दहावीसाठी भूगोलाचे नवीन पाठ्यपुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात भारताचा नकाशा व भारतीय ध्वजावरील अशोक चक्रासंदर्भात चूक झाली आहे. या व पुस्तकातील अन्य चुकांबाबत सटाणा येथील माजी प्राचार्य के. यू. सोनवणे यांनी या संदर्भात मौखिक व लेखी आक्षेप नोंदवले होते. मात्र, पाठ्यपुस्तक मंडळाने त्याची दखल घेतली नाही, असे विखे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

Web Title: gergraphy issue crime radhakrishna vikhe patil