ठाणे स्थानकात प्लास्टिक बाटलीद्वारे मिळवा पाच रुपये

ठाणे : रेल्वे  स्थानकात बसवलेली प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन. (छायाचित्र - दीपक कुरकुंडे)
ठाणे : रेल्वे स्थानकात बसवलेली प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन. (छायाचित्र - दीपक कुरकुंडे)

ठाणे : ठाणे रेल्वेस्थानकात प्लास्टिकचा कचरा वाढत असल्यामुळे प्लास्टिक बाटल्यांचे विघटन करण्यासाठी पंधरवड्यापूर्वी प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन कार्यान्वित करण्यात आली. या मशीनमुळे स्थानकातील प्लास्टिक बाटल्यांचा कचरा दूर होऊन रेल्वे रुळांवरील कचरादेखील कमी होण्यास मदत होणार आहे. ठाणे स्थानकात मशीन बसवल्यानंतर पंधरवड्यात अवघे 30 किलो प्लास्टिक गोळा झाल्याचे शुक्रवारी पाहणीदरम्यान समोर आले आहे. तेव्हा, राक्षसरुपी प्लास्टिक संपवण्याच्या बदल्यात प्रवाशांना आता पाच रुपये मोबदलादेखील मिळणार असल्याने या प्रकल्पाची व्यापक जनजागृती करण्याचे रेल्वे प्रशासन आणि सदरचा प्रकल्प राबवणाऱ्या "बायोकृक्‍स इंडिया' कंपनीने ठरवले आहे. 

ठाणे रेल्वेस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम व स्वच्छता जनजागृती नेहमीच राबवली जाते. याशिवाय प्लास्टिकविरोधात व्यापक प्रयत्न सुरू असून रेल्वे रुळांवरील प्लास्टिक बाटल्यादेखील सफाई कर्मचारी व कचरावेचकांद्वारे दूर केल्या जात आहेत. परंतु, यामध्ये प्लास्टिक बाटल्यांचा दररोजचा खच फार मोठा असल्यामुळे तो दूर करण्यासाठी 25 ऑक्‍टोबरला ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक दोनवर एक प्लास्टिक क्रशिंग मशीन बसवण्यात आली.

या मशीनमध्ये बाटली टाकणाऱ्यास पाच रुपये मोबदला पेटीएमच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. गेल्या पंधरा दिवसांत या मशीनमध्ये 30 किलो प्लास्टिक जमा झाल्याची माहिती या उपक्रमाची संयोजक कंपनी बायोकृक्‍सचे कार्यकारी अधिकारी अजय मिश्रा यांनी दिली. मशीनध्ये गोळा झालेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

...असे मिळणार पाच रुपये 
बाटली या मशीनमध्ये टाकल्यावर स्क्रीनवर आपला मोबाईल क्रमांक दिल्यानंतर पाच रुपये पेटीएमद्वारे खर्च करण्याबाबतचा संदेश तुमच्या मोबाईलवर येणार आहे. पेटीएममध्ये हे पैसे जमा होणार असल्याने त्याचा विनियोग प्रवाशांना कशाप्रकारेही करता येणार आहे. एका मोबाईलधारकाला केवळ दोनच वेळा या संधीचा लाभ घेता येणार असून त्यानंतर या पाच रुपयांचा लाभ मिळणार नाही. केवळ प्रवाशांना स्वच्छतेची सवय लागावी; तसेच भविष्यात प्लास्टिक बाटल्या मशीनमध्येच पडाव्यात, हाच यामागे उदात्त हेतू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

ठाणे स्थानकात एकूण 16 उपाहारगृहे असून दररोज सुमारे 10 हजार लिटर पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची उलाढाल होत असते. इतक्‍या मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा प्लास्टिकचा कचरा विल्हेवाट लावण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. प्लास्टिक बाटली या मशीनमध्ये टाकणाऱ्यास थेट लाभ मिळावा अथवा रेल्वे तिकिटामध्ये सवलत देण्याबाबत संबंधित कंपनीसोबत चर्चा सुरू असून लवकरच स्थानकातील वर्दळीच्या ठिकाणांवर आणखी मशीन बसण्यात येणार आहे. 
- आर. के. मीना, 
स्थानक प्रबंधक, ठाणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com