सोनाळ्यातील जिऊ ठरली शंभर टक्के गुणांची मानकरी

get for Hundred percent mark from rural girl
get for Hundred percent mark from rural girl

वाडा : राज्याच्या माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. वाडा तालुक्यातील सोनाळे ह्या खेडेगावातील जिऊ निमकर ह्या मराठी माध्यमातील विद्यार्थीनीने शंभर टक्के गुण मिळवले आहे. कोणत्याही कोचिंग क्लासेस शिवाय देखिल चांगले यश मिळवता येते याचे उत्तम उदाहरण जिऊने घालून दिले आहे.

वाडा तालुक्यातील सोनाळे ह्या गावातील जुई हीने इयत्ता 4 थी पर्यंतचे शिक्षण सोनाळ्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घेतले. त्यानंतर तिने सातारा जिल्ह्यातील फलटण येथील कमला निमकर बालभवन ह्या प्रयोगशील शाळेत प्रवेश घेतला. ह्या शाळेत मिळालेल्या शैक्षणिक वातावरणाचा फायदा तिला मिळाल्याचे जिऊ म्हणते. शाळेत जो अभ्यासक्रम शिकवला गेला त्याबळावरच ती परिक्षेला सामोरी गेली. कोणतेही कोचिंग क्लासेस अथवा अन्य शैक्षणिक उपक्रमांचा आधार न घेता अभ्यासात सुरवातीपासून सातत्य राखल्याने हे यश मिळविले आहे. त्यामुळे  इंग्रजी माध्यमाशिवाय चांगले शिक्षण व गुण मिळत नाहीत ह्या गैरसमजाला मराठी माध्यमातील जिऊच्या यशाने उत्तर मिळाले आहे.

जिऊने शंभर टक्के गुण मिळवून चांगले यश मिळविले असले तरी ह्या यशाने निमकर कुटुंब अजिबात हुरळून गेलेले नाही. ह्या मार्कांचे  भविष्यातील यशात फारसे महत्व नसते असे परखड मत जिऊचे वडील शिक्षणतज्ज्ञ नीलेश निमकर यांनी मांडले. तर करियरबाबत फारशी कल्पना नसल्याने सध्यातरी विज्ञान शाखेत प्रवेश घेणार असून पुढे जाऊन विविध क्षेत्रांची माहिती मिळाल्यानंतर करियर निवडीचा निर्णय घेता येईल असे जिऊने सांगितले.

"जिऊला चांगले मार्क्स मिळाले याबद्दल अभिमान तर आहेच पण ही अगदीच अन्याय्य शर्यत आहे. भावी काळात तिच्यासारख्या सुविधा न मिळणाऱ्या मुलांसाठी आणि त्यापायी अभ्यासात मागे पडणाऱ्यांसाठी ती काही भरीव करू शकली तर या यशाचे सार्थक असेल." 
 निलेश निमकर, जिऊचे वडील तथा क्वेस्ट संस्थेचे संचालक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com