देश सेवे करिता आर्मीत भर्ती व्हा - कर्नल मनु सुदन

colonel
colonel

मुंबई : देशसेवे करीता आर्मीत भर्ती व्हा! आर्मीचा यूनिफॉर्म सर्व भारतीयांच्या अभिमानाचा केंद्र बिंदू आहे.सैनिक म्हणजे देशाचा रक्षण कर्ता होय. देशावरील विविध आपदांच्या वेळी आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स नेहमी आपले कर्तव्य बजावत नागरिकांच्या जीवीत आणि मालमत्तेचे रक्षण करीत असतात. जनतेच्या हृदयात सनिकांप्रति एक विशिष्ठ सन्मान असल्याने भारतीय सीमेचा आणि तिरंग्याचा रक्षणकर्ता म्हणून प्रत्येक सैनिक ओळखला जातो. असे आवाहन मुंबई आर्मी भर्ती बोर्डाचे प्रमुख कर्नल मनु सुदन (Manu Soodan) यांनी केले आहे. येत्या 4 ते 13 ऑक्टोबर 2018 रोजी हि भर्ती कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी,पनवेल (जिल्हा-रायगड) येथे होणार आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक आणि पालघर या सहा जिल्हयातील युवकांनी www.joinindianarmy.nic.in. या वेब साईडवर संपर्क साधावा.

या जागांची भर्ती होईल
सोल्जर जनरल ड्यूटी, टेक्नीकल(एविएशन एंड अम्युनेशन एक्सामिनर), सोल्जर (नर्सिंग- असिस्टन्ट), सोल्जर ट्रेसमन्स,सोल्जर क्लर्क, स्टोर कीपर आदी जागांची भर्ती होणार आहे. ही भर्ती प्रतिभर्ती प्रमाणेच  संपूर्णपणे पारदर्शक स्वरुपात होणार असून कोणीही कोणत्याही प्रकारे दलाल अथवा मध्यस्थामार्फ़त भर्ती प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर
कायदेशीर कारवाही करण्यात येईल.जर कोणाला असे काही आढळले तर तात्काळ पोलिस आणि आर्मीशी संपर्क साधावा असे मनु सुदन म्हणाले.आर्मी भर्ती करिता मोठ्या प्रमाणात गरीब कुटुंबातील आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील उमेदवार येणार असून 100 टक्के फिट आणि परीक्षेत उत्तीर्ण उमेदवार मेरीट लिस्ट प्रमाणेच भर्ती होईल याचा सर्व उमेद्वारांनी विश्वास बाळगावा असे कर्नल मनु सुदन यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com