अत्यवस्थ रुग्णाला मिळाले जीवदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

मुलुंड - हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या ६० वर्षीय रुग्णाला कल्याण येथील ५२ वर्षीय व्यक्तीचे हृदय मिळाल्याने जीवदान मिळाले आहे. ‘फोर्टिस’मधील तज्ज्ञ डॉक्‍टरांनी या अत्यवस्थ रुग्णावर ही यशस्वी शस्त्रक्रिया केली.

एका खासगी संस्थेमध्ये अकाऊंटंट असलेल्या ६० वर्षीय रुग्णाला डायलेटेड कार्डिओमाथोपथी या दुर्धर हृदयरोगाने ग्रासले होते. परिणामी हा रुग्ण ३ जानेवारी २०१९ पासून हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत होता. त्यांच्यावर ‘फोर्टिस’मधील हृदय प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉक्‍टर अन्वय मुळे व त्यांच्या चमूने प्रयत्नांची पराकाष्ठा करत हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केली.

 याबाबत अधिक माहिती देताना डॉ. मुळे म्हणाले की, कल्याण येथील ५२ वर्षीय रुग्णाचा त्यांच्या राहत्या घरी अंतर्गत रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला. त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचे ठरविले. त्यासार त्या मृत व्यक्तीचे हृदय, लिव्हर, किडनी व दृष्टिपटल (कॉर्निआ) या अवयवांचे दान करण्यात आले. 

सध्या हृदय प्रत्यारोपित केलेला ६० वर्षीय रुग्ण अतिदक्षता विभागात असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. वर्ष २०१९ मधील आणि ‘फोर्टिस’मधील ही प्रथम शस्त्रक्रिया असून, २०१५ पासूनची ही ८९ वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे.
- डॉ. अन्वय मुळे, हृदय प्रत्यारोपण विभागप्रमुख, फोर्टिस रुग्णालय

Web Title: Get the patient life