शेकापला हद्दपार करण्यासाठी सज्ज व्हा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

पेण मतदारसंघाचा विकास हा निष्क्रिय शेतकरी कामगार पक्षामुळे खुंटला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शेकापला हद्दपार करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी पेण शहरातील कार्यकर्त्यांना केले. 

मुंबई : पेण मतदारसंघाचा विकास हा निष्क्रिय शेतकरी कामगार पक्षामुळे खुंटला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शेकापला हद्दपार करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी पेण शहरातील कार्यकर्त्यांना केले. 

येथील आगरी समाज सभागृहात भाजपच्या कार्यकर्त्यांची सभा घेण्यात आली. या वेळी तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, रायगड जिल्हा प्रवक्‍ते मिलिंद पाटील, युवा नेते वैकुंठ पाटील, चिटणीस बंडू खंडागळे, अनंता पाटील, गोकुळ पाटील, वंदना म्हात्रे, प्रचिता पाटील, पेण तालुका भाजप युवा अध्यक्ष शिवाजी पाटील, विधी पाटील, हिमांशू कोठारी, संजय घरत यांच्यासमवेत भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या वेळी रवीशेठ पाटील म्हणाले की, फक्त निवडणुका जवळ आल्यावर गोड बोलून कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात टाकायचा, एवढेच काम शेकापचे पुढारी करतात. पेण नगरपालिकेत सत्तेत आल्यापासून पेण शहरात अनेक विकासकामे केली आहेत. तलावांचे सुशोभीकरण, बायपास रस्ता, शहरातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, थीम पार्क, नवीन पाणीपुरवठा योजना, अशी विविध विकास कामे मार्गी लागली आहेत. पेण मतदारसंघाचा विकास हा फक्त भाजपच करू शकतो, असेही त्यांनी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Get ready to dispel the shekap party