मला 26/11 ची माहिती देणारे फोन येत आहेत! मुंबई पोलिसांकडे अज्ञात व्यक्तीची गूढ तक्रार | Mumbai Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Crime

Mumbai Crime : मला 26/11 ची माहिती देणारे फोन येत आहेत! मुंबई पोलिसांकडे अज्ञात व्यक्तीची गूढ तक्रार

मुंबई : मुंबई पोलीस कंट्रोल रूमला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला असून "मला २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात माहिती देणारे फोन येत आहेत" अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस अलर्टवर आले असून या फोनसंदर्भात माहिती घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, याआधी सुद्धा मुंबई पोलीस कंट्रोल रूमला अनेकदा धमकीचे फोन कॉल आले होते. त्यामध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार किंवा मुंबई शहर बॉम्बने उडवून देणार असल्याच्या धमक्या अनेकवेळा फोनद्वारे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या व्यक्तीने फोन केला असून "मला २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात माहिती देणारे फोन येत आहेत" अशी माहिती दिलीये.

रविवारी रात्री हा फोन कॉल आला असून सदर व्यक्ती राजस्थान येथील असल्याचं त्याने पोलिसांना फोनवर सांगितलं आहे. मुंबई पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर त्याने लगेच फोन कट केला. त्यामुळे संशय निर्माण झाला असून पोलिसांनी अधिक तपास सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :policecrimeattack