घाटकोपर स्फोटातील आरोपीला औरंगाबादमधून अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

मुंबई - मुंबईत 2002 मध्ये घाटकोपर येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी इरफान कुरेशी याला गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नुकतीच औरंगाबाद येथून अटक केली. ओमानच्या निमित्ताने नातेवाईकांना भेटण्यासाठी इरफान आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या वेळी सापळा रचून अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपासासाठी इरफानला महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात दिले आहे. 

घाटकोपर येथे 2 डिसेंबर 2002 रोजी सायंकाळी बेस्ट बस डेपोतील बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटामध्ये सुमारे 49 जण जखमी झाले होते. या गुह्यात यापूर्वी पोलिसांनी 19 जणांना अटक केली होती; तर आजही या गुन्ह्यातील नऊ आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. या फरार आरोपींमध्ये इरफानचा सहभाग होता. मागील 16 वर्षांपासून तपास यंत्रणांना चकवा देणाऱ्या इरफानची माहिती गुजरात एटीएसला मिळाली. इरफान हा ओमानसाठी औरंगाबाद येथील कुटुंबियांच्या भेटीला शहा कॉलनीत आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली.

Web Title: Ghatkopar blast accused arrested in Aurangabad