मुंबई - केमिकलच्या टाकीत गुदमरून एकाचा मृत्यू, दोघांवर उपचार सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

घाटकोपरमध्ये केमिकल कंपनीत टाकी स्वच्छ करताना तीन कामगार गुदमरल्याची घटना घडली आहे.

मुंबई - केमिकलच्या टाकीत गुदमरून एकाचा मृत्यू, दोघांवर उपचार सुरु

मुंबई - घाटकोपरमध्ये (Ghatkopar) केमिकल कंपनीत टाकी स्वच्छ करताना तीन कामगार गुदमरल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी घाटकोरमध्ये असलेल्या एस के डायस्टफस केमिकल कंपनीत ही दुर्घटना घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, केमिकलची टाकी स्वच्छ करत असताना त्यातल्या विषारी वायूमुळे तिघेही गुदमरले. यातील रामनिगोर सरोज या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर रुबीन डिंगकर आणि श्रावण सोनावणे या दोघांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा: मुंबई - गाणी ऐकण्यासाठी घेतलेले मोबाईल देईना म्हणून मित्राची हत्या

सकाळी सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यातील तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. या तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai News
loading image
go to top