गर्भवतीची भररस्त्यात गळा चिरून हत्या

file photo
file photo

मुंबई : घाटकोपर येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील पदपथावर सकाळी मीनाक्षी चौरसिया या २० वर्षीय गर्भवती महिलेचा मृतदेह आढळून आला; तर असल्फा येथे एका तरुणाची हत्या झाली आहे. २४ तासांत दोन हत्या आणि भररस्त्यात गळा चिरलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
घाटकोपर पश्‍चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्गाला लागून असलेल्या नारायण नगर परिसरातील शिवपुरी चाळीत ही महिला राहत होती. रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नारायण नगरजवळच लाल बाहादूर शास्त्री मार्गाच्या पदपथावर तिचा मृतदेह आढळून आला. तिची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
भररस्त्यात सकाळी हा मृतदेह आढळून आल्याने घाटकोपरमध्ये एकच खळबळ उडाली. लाल बहादूर शास्त्री मार्ग हा मुंबईतील महत्त्वाचा आणि वर्दळीचा रस्ता आहे. असे असताना भररस्त्यात हत्या झाल्याने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com