विरारच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये भूत? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

सत्य काय? 
- व्हायरल व्हिडीओ विरारच्या संजीवनी हॉस्पिटलमधला नाही 
- संजीवनी हॉस्पिटलमध्ये अशी जागाच नाही 
- व्हिडीओ एडीट करून व्हायरल करण्यात आला 
- व्हायरल व्हिडीओ मलेशियातील टेलेमुव्हीजमधला 
- लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न 

मुंबई - विरारमधील संजीवनी हॉस्पिटलमध्ये रात्री भूत फिरत आहे, असा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पांढरे वस्त्र परिधान केलेली तरुणी रात्रीच्या अंधारात फिरत असल्याचे यात दाखवले आहे. ही तरुणी रात्री पिलरवरून पहिल्या मजल्यावर उडी मारताना कॅमेऱ्यात कैद झाली. हे भूतच असल्याचा दावा करून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यात येत आहे; पण व्हायरल व्हिडीओत दिसणारे भूतंच आहे का..?, याची पडताळणी "सकाळ माध्यम समूहा'च्या "साम' वाहिनीने केली. त्यात व्हायरल व्हिडीओमधील दावा खोटा ठरला आहे. 

विरारच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये रात्री भूत फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. हॉस्पिटलमध्ये रात्री 3 वाजता रहस्यमय तरुणी सीसी टीव्हीमध्ये कैद झाली. या व्हिडीओमुळे हॉस्पिटलमधील रुग्णही आम्हाला लवकर डिस्चार्ज द्या, अशी विनंती करू लागले आहेत. त्यामुळे संजीवनी हॉस्पिटलमध्ये रुग्णाला घेऊन जायला लोक घाबरत आहेत. सत्यता जाणून घेण्यासाठी "सकाळ माध्यम समूहा'च्या "साम' वाहिनीने पडताळणी सुरू केली. त्या वेळी संजीवनी हॉस्पिटलमध्ये व्हायरल व्हिडीओत दिसत असलेली जागाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी 24 तास सुरक्षा असून, रात्री कुणीही महिला फिरत नसल्याचे संजीवनी हॉस्पिटलचे सचिव महेश देसाई आणि कर्मचारी प्रीतम सकपाळ यांनी सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनीही भूतप्रेत, चेटकीण नसल्याचे सांगत घाबरून जाण्याचा प्रश्‍नच नसल्याचे स्पष्ट केले. हॉस्पिटल प्रशासनानेही संजीवनी हॉस्पिटलच्या बदनामीचा हा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे. व्हिडीओ व्हायरल करून लोकांना घाबरवण्यात येत आहे. हा व्हिडीओ एका चित्रपटातील असून, विरारच्या संजीवनी हॉस्पिटलमधील नसल्याचा दावा केला आहे. 

सत्य काय? 
- व्हायरल व्हिडीओ विरारच्या संजीवनी हॉस्पिटलमधला नाही 
- संजीवनी हॉस्पिटलमध्ये अशी जागाच नाही 
- व्हिडीओ एडीट करून व्हायरल करण्यात आला 
- व्हायरल व्हिडीओ मलेशियातील टेलेमुव्हीजमधला 
- लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न 

Web Title: ghost in sanjivani hospital?