esakal | कोपरी पुलावरील गर्डरचे काम पूर्ण; एक दिवस आधीच यशस्वी लॉचिंग
sakal

बोलून बातमी शोधा

कोपरी पुलावरील गर्डरचे काम पूर्ण; एक दिवस आधीच यशस्वी लॉचिंग

ठाणे आणि मुंबई शहरांना जोडणा-या नवीन कोपरी पुलावरील सात लोखंडी गर्डरचे लॉन्चिंग रविवारी पहाटे सातवाजेपर्यंत यशस्वीरित्या पुर्ण करण्यात आले आहे.

कोपरी पुलावरील गर्डरचे काम पूर्ण; एक दिवस आधीच यशस्वी लॉचिंग

sakal_logo
By
राहुल क्षीरसागर

ठाणे  : ठाणे आणि मुंबई शहरांना जोडणा-या नवीन कोपरी पुलावरील सात लोखंडी गर्डरचे लॉन्चिंग रविवारी पहाटे सातवाजेपर्यंत यशस्वीरित्या पुर्ण करण्यात आले आहे. या कालावधीत मुंबईहून ठाणे आणि ठाण्याहून मुंबईच्या दिशेने ये- जा करणा-या सर्व हलक्‍या, जड आणि अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. त्यामुळे शनिवारी भिवंडी बायपासवर वाहनांची मोठी कोंडी झाली होती. 

शनिवारी आणि रविवारी रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत असा दोन दिवस 14 तासांचा ब्लॉक घेत एमएमआरडीएतर्फे गर्डर टाकण्याचे नियोजन करण्यात आले होते; मात्र शनिवारी रात्री 11 वाजता सुरु करण्यात आलेले काम रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंतच पूर्ण करण्यात आले. नियोजनबद्ध कामामुळे एका दिवस आधीच काम पूर्ण झाल्याने खासदार राजन विचारे यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले. 
गर्डर उचलण्यासाठी 5 क्रेन ,5 ट्रेलर व 1 पुलर अशी यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. यावेळी खासदार राजन विचारे, वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त बाळासाहेब पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त पालवे एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता प्रकाश भांबरे, कार्यकारी अभियंता विनय सुर्वे स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे उपस्थित होते. 

मुंबई, रायगड ठाणे परिसरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

वाहतूकीस परवानगी 
जुन्या कोपरी पुलावर मोठी क्रेन उभी करून हे काम होणार असल्याने या पुलावरून मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने ये- जा करणा-या वाहनांना शनिवारी व रविवारत्री रात्री प्रवेश बंद करण्यात आला होता; मात्र रविवारी सकाळी वाढीव एक तास दिल्याने गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले. त्यामुळे रविवारी रात्री प्रवेश बंदी करण्याची आवश्‍यकता नसल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. 

Girder work on kopari bridge completed One day already successful launching in thane

--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image