शरद पवारांच्या चहापानाने भारावली "आम्ही गिरगांवकर टीम"

दिनेश चिलप मराठे
शनिवार, 30 जून 2018

मुंबई : आम्ही गिरगांवकर टीमसाठी 28 जून 2018 हा दिवस आयुष्यातला विशेष दिवस होता. आम्ही गिरगांवकर टीमला आमच्या कार्याची दखल घेत चहापान साठी आमंत्रित करून आम्ही केलेल्या कामाची प्रशंसा स्वतः राजकारणा मधील बुद्धिवान आणि कीर्तिवान व्यक्ती शरद पवार यांनी आम्हाला बोलावून केली. एवढ्या मोठ्या व्यक्तीने 17 मिनटे चर्चा केली आणि चांगलं कार्य करत रहा कोणतीही समस्या असो माझे घर तुम्ही आता पाहिले आहे, हा दरवाजा तुमच्यासाठी नेहमी उघडा असेल हे आवर्जून सांगितले. हे उद्गार आहेत आम्ही गिरगाव टीमचे ज्यांना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी चहा पानास बोलाविले होते त्या नंतरचे.

जर बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनीही आमचे कौतुकच केले असते असेही हे भारावलेले टीम सदस्य सांगत होते. शरद पवार साहेबांनी केलेली आमची प्रशंसा म्हणजे लहान वयोगटापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक गिरगावकरांची प्रशंसा आहे. ज्यांच्यामूळे हा दिवस आम्हाला लाभाला तसेच याच खरं श्रेय आम्हाला साथ देणाऱ्या मुंबई आणि महाराष्ट्रा मधील देखील प्रत्येक व्यक्तीचे आहे जे आम्हाला फेसबुक, व्हाट्सअॅप आणि कॉलद्वारे शाबासकी व साथ देत असतात मग ते कुठल्याही पक्षातील असो. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुंबई सचिव विजय वाडकर यांनी हा दुग्ध शर्करा योग घडवून आणल्याचे टीमने सांगितले.

Web Title: girgaonkar team meets sharad pawar