अरुणाचलमधून आणलेल्या मुलीची पनवेलमधून सुटका

मंगेश सौंदाळकर
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

मुंबई - फेसबुकवरून तोंडदेखली मैत्री करून एका किशोरवयीन मुलीला वेश्‍याव्यवसायात ढकलण्याचा डाव मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने हाणून पाडला. या मुलीला भूलथापा देऊन पळवून नेण्यात आले होते. पनवेलजवळ तिला डांबून ठेवले होते. समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी कौशल्याने तपास करून तिची सुखरूप सुटका केली. तिला पळवून नेणाऱ्या तरुणाला पनवेल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही मुलगी अरुणाचल प्रदेशातील आहे. ती बारावीत शिकते. एका तरुणाने फेसबुकवरून तिच्याशी मैत्री केली. भूलथापा देऊन तिला 18 नोव्हेंबरला पनवेलमध्ये पळवून आणले. 10 दिवस शोध घेतल्यावरही मुलगी न सापडल्याने तिच्या कुटुंबीयांनी अरुणाचल प्रदेशातील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला. तिच्या नातेवाइकांनी दिल्ली पोलिसांशीही संपर्क साधला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या अंमलबजावणी शाखेचे पोलिस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. पाटील यांनी सहायक आयुक्त अरविंद सावंत, वरिष्ठ निरीक्षक रवींद्र गिड्डे, निरीक्षक प्रवीण कदम यांचे पथक तयार केले. या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधाराने तपास सुरू केला. दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांना आरोपी तरुणाने खंडणीसाठी फोन केला. एका बॅंक खात्यात पैसे जमा करा, असे सांगितले. त्याच वेळी मुलीने आरोपीची नजर चुकवून कुटुंबीयांना फोन केला. पनवेलजवळ रहमतनगरपासून एक किलोमीटरवर रुग्णालय आणि पोलिस चौकी असून, तिथेच कुठेतरी मला कोंडून ठेवले आहे, असे तिने सांगितले. उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी या दुव्यावरून तपासाला गती दिली. त्या परिसरातील रुग्णालय आणि पोलिस चौकी शोधून काढण्यात आली. नेमक्‍या ठिकाणी छापा मारून मुलीची सुटका करण्यात आली. अपहरण करणाऱ्या तरुणालाही अटक केली.

Web Title: Girl from Arunachal brought deliverance from Panvel