‘त्या’ मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे नाही; राज्य वैद्यकीय उपसमितीचा निर्वाळा

Corona Vaccination
Corona Vaccinationsakal media

मुंबई : 14 जानेवारी 2022 रोजी एका व्यक्तीने ट्वीटरवर, 15 वर्षीय मुलीचा लसीकरणामुळे (vaccination girl death issue) मृत्यू झाला, अशी चुकीची बातमी प्रसारित केली. यानंतर या बातमीची सखोल तपासणी करून अहवाल बनवण्यात आला. लसीकरणानंतर घडणार्‍या प्रतिकूल घटनांची चिकित्‍सा करण्‍यासाठी केंद्र शासनाच्या (central government) मार्गदर्शक तत्वानुसार वैद्यकीय तज्ञांची राज्‍य स्‍तरीय उपसमिती, मुंबई विभाग नेमण्यात आली आहे. सदर समितीची तातडीने बैठक सोम 17 जानेवारी रोजी झाली. या घटनेचा अहवाल समिती समोर सादर करण्‍यात आला. सदर मृत्‍यू लसीकरणामुळे झाला नाही, असे स्पष्ट मत समितीने दिले आहे. (Girl death is not because of vaccination as medical authorities information)

Corona Vaccination
मुंबई : तीन कोटींचं हेरॉईन बाळगणारा पोलिसांच्या जाळ्यात; आरोपीला अटक

भारत सरकारने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार 15 ते 17 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड लसीकरण मुंबई महानगरपालिकेने 3 जानेवारी 2022 पासून सुरू केले. यात, मुंबईतील महानगरपालिका, शासकीय आणि खासगी कोविड लसीकरण केंद्रांवर आजपर्यंत 1,47,944 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या वयोगटासाठी फक्त कोवॅक्सिन लसीचा वापर केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com