किशोरवयीन नैराश्‍याच्या विळख्यात!

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 31 डिसेंबर 2018

मुंबई - सोळा ते वीस वर्षांच्या तरुणांना सध्या ‘एग्झायटी डिप्रेशन’ नामक भयानक मानसिक खच्चीकरणाच्या आजाराने विळखा घातला आहे. देशातील सुमारे २५ टक्के किशोरवयीन या आजाराच्या विळख्यात अडकले असल्याचे समोर आले आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच जाहीर केलेल्या एका आकडेवारीनुसार २०२० पर्यंत  ‘एग्झायटी डिप्रेशन’ हा जगातील दुसरा मोठा आजार ठरणार आहे. गेल्या दशकाच्या तुलनेत या आजारात आता १८ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. 

आगामी काळात वाढती स्पर्धा, बेरोजगारी, शिक्षणासाठी सुरू असलेली चढाओढ, यामुळे हा आजार २०२० पर्यंत आणखी बळावण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. विशेषत: तरुणी व महिलांमध्ये हा आजार वाढत असल्याचे दिसून येत आहे.  

‘एग्झायटी डिप्रेशन’ म्हणजे काय?
सध्याच्या स्पर्धेच्या धावत्या जीवनमान पद्धतीमुळे प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असतात. अशात जरा काही बिघडले, की मन अस्वस्थ होते. एका मर्यादेपलीकडे गेलेली ही अस्वस्थता व अपेक्षापूर्ती न झाल्याने त्यानंतर येणारे कमालीचे नैराश्‍य यालाच ‘एग्झायटी डिप्रेशन’ म्हटले जाते.

आजाराची लक्षणे
या आजारामुळे शरीरात व मानसिक रचनेत बरेच बदल होतात. हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. झोप व्यवस्थित न लागणे, दिवसरात्र बेचैन असणे, भूक लागण्याचे प्रमाण कमी होत जाणे, हातापायांना सतत घाम येणे, आत्मविश्‍वास कमी होत जाणे, थकवा व सुस्ती जाणवत राहणे, एकाग्रतेत घट होणे, ही या आजाराची लक्षणे आहेत.

नकारात्मकतेपासून दूर राहत झालेल्या चुकांवर रडत न बसता त्या चुकांमधून शिकावे. परिस्थितीची समीक्षा करत नियमित व्यायाम करून मनमोकळ्या गप्पा मारून आणि आपल्यातील सुप्त कलेला वाव देऊन ‘एग्झायटी डिप्रेशन’पासून स्वत:ची सुटका करून घेणे शक्‍य आहे. 
- वीरेंद्रकुमार जाधव, सामाजिक समस्या विश्‍लेषक

Web Title: Girl exisity depression