व्हॉट्सऍप ग्रुपमुळे झाले ऑपरेशन 'मुस्कान' फत्ते

दीपक शेलार
शनिवार, 29 डिसेंबर 2018

चक्क चार वर्षानंतर एका तरुणीच्या अपहरणाचा छडा लागला आहे. आई-वडीलांचे छत्र हरपलेल्या 17 वर्षीय युवतीचे लग्न लावुन देण्याचा घाट घालणाऱ्या मामीच्या तावडीतुन सुटका व्हावी. म्हणुन घर सोडलेल्या युवतीची तब्बल 4 वर्षानंतर म्हणजेच वयाच्या 21 व्या वर्षी सुटका केली. ‘ऑपरेशन मुस्कान’ या मोहिमेतंर्गत ठाणे पोलिसांनी, पिडीतेने वर्षभरापूर्वी शाळा सोडल्याचा दाखल काढल्याचा दुवा मिळताच तिच्या शाळकरी मित्रमंडळीच्या व्हॉट्सऍपच्या ग्रूपची तपासणी करून अपहरणाचा गुन्हा उघडकीस आणला.

ठाणे : सोशल मिडीयाचे जसे, तोटे आहेत तसे फायदेही आहेत. याचा प्रत्यय ठाण्यात आला. मोबाईलमधील व्हॉटसऍपमुळे ऑपरेशन मुस्कान फत्ते करण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे.

चक्क चार वर्षानंतर एका तरुणीच्या अपहरणाचा छडा लागला आहे. आई-वडीलांचे छत्र हरपलेल्या 17 वर्षीय युवतीचे लग्न लावुन देण्याचा घाट घालणाऱ्या मामीच्या तावडीतुन सुटका व्हावी. म्हणुन घर सोडलेल्या युवतीची तब्बल 4 वर्षानंतर म्हणजेच वयाच्या 21 व्या वर्षी सुटका केली. ‘ऑपरेशन मुस्कान’ या मोहिमेतंर्गत ठाणे पोलिसांनी, पिडीतेने वर्षभरापूर्वी शाळा सोडल्याचा दाखल काढल्याचा दुवा मिळताच तिच्या शाळकरी मित्रमंडळीच्या व्हॉट्सऍपच्या ग्रूपची तपासणी करून अपहरणाचा गुन्हा उघडकीस आणला. 

शास्त्रीनगर येथे आपल्या मामीसोबत राहणाऱ्या या युवतीचे वडील तिच्या लहानपणीच सोडून गेले होते. तर 2009 मध्ये तिच्या आईचे निधन झाल्यानंतर ती ठाण्यातील मामा-मामीकडे राहण्यास आली. याचदरम्यान, ती 17 वर्षाची असताना, मामीने तिच्या लग्नाचा घाट घातला. मात्र, लग्न करायचे नसल्याने तिने 26 नोव्हेंबर 2014 रोजी सकाळी मामी मॉर्निग वॉकला गेल्याची संधी साधुन घरातून धूम ठोकली. जाताना तिने एक चिठ्ठी मामीसाठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीमध्ये, मी कोणाबरोबर पळून जात नसुन मला शोधू नये. मी, काही दिवसात जीव देणार आहे. असे नमुद केले होते. याप्रकरणी, मामीने वर्तकनगर पोलिस ठाण्यात 27 नोव्हेंबर 2014 रोजी तिला पळवुन नेल्याची तक्रार दिली. त्यानुसार, अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एक वर्षानी या हा गुन्हा ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक (एएचटीसी ) विभागाकडे वर्ग केला.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना, वर्षभरापूर्वी तिने शाळा सोडल्याचा दाखला काढल्याची माहिती एएचटीसीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना मिळाली. त्यामुळे, तिने जीव दिला नसुन जिवंत असल्याचा पहिला दुवा हाती लागला. त्यानुसार, पोलिस पथकाने तिच्या मित्रमंडळी, नातेवाईकांशी संपर्क साधला. याचदरम्यान, तिच्या जवळच्या मित्र-मंडळीच्या फेसबुकवर तिचा शाोध घेण्यासह तिच्याशी संबधीत व्हॉट्सऍप ग्रूपची तपासणी केली. अन, एका ग्रुपमध्ये तिच्यासारखी दिसणाऱ्या एका तरूणीची छबी पोलिसांच्या निदर्शनास आली. ती तरूणी ज्याच्या संपर्कात होती त्याची विचारपुस केल्यावर त्याने तिला पैशांची ऑनलाईन मदत केल्याचे समोर आले. त्यानुसार, तिचा बँक खाते सापडल्याने तिचा दुसरा मोबाईल नंबर बँकेतुन मिळाला. मात्र, हा नंबरही तिस:याच्याच नावाचा होता. त्या व्यक्तीचा शोध घेतल्यावर अखेर गुरूवारी पोलिस तिच्यापर्यंत पोहोचले. अन, चार वर्षानंतर 21 वर्षीय तिचा छडा लागला. यावेळी तिने, मामीने 17 वर्षाची असतानाच लग्नाचा घाट घातल्याने हे पाऊल उचलल्याची कबुली दिली.

Web Title: girl found for whatsapp group